agriculture news in Marathi, devendra Fadnvis says, action against bank regarding crop loan, Maharashtra | Agrowon

पीककर्जप्रश्नी बॅंकांवर कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणीस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

जळगाव  ः खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंका टाळाटाळ करत आहेत. राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश देऊनही बॅंकांनी कर्जवाटपात आखडता हात घेतला. शेतकऱ्यांना जे कर्ज दिले जाते, त्यावरील व्याजाची हमी शासनाने घेतली आहे. परंतु ज्या बॅंका कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसेच उद्दिष्टापेक्षा कमी कर्ज देणाऱ्या बॅंकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. 

जळगाव  ः खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंका टाळाटाळ करत आहेत. राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश देऊनही बॅंकांनी कर्जवाटपात आखडता हात घेतला. शेतकऱ्यांना जे कर्ज दिले जाते, त्यावरील व्याजाची हमी शासनाने घेतली आहे. परंतु ज्या बॅंका कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसेच उद्दिष्टापेक्षा कमी कर्ज देणाऱ्या बॅंकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळा, राजे संभाजी नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी (ता. ८) येथे आले होते. या वेळी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्यसचिव प्रवीण परदेशी, नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

एक मिशन म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करावे. सातबारा हा वस्तुस्थितीदर्शकच असावा. कृषी व महसूल विभागाने एकत्रितपणे कार्यवाही करावी. मुख्यमंत्री पेयजल याजनेसंबंधी ४८ योजना सुरू असून, त्या मार्चअखेर पूर्ण कराव्यात. धरणगाव व भुसावळ येथील पाणी योजना अमृत योजनेत घेतल्या आहेत. त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी एक वेळ निश्‍चित करा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संबंधीच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, एरंडोल येथील पाणी योजना सप्टेंबर, २०१९ अखेर पूर्ण व्हायला हव्यात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत समाविष्ट असलेल्या गावांची संख्या अधिक असेल, तर या गावांमधील योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित कराव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

अधिकाऱ्यांनी बांधावर जावे
शेतात नेमकी काय स्थिती आहे, हे समोर येण्यासाठी व त्या दृष्टीने शासनाला उपाययोजना करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे पीकपेरा, पीकस्थितीचे अहवाल पथदर्शक असतात. परंतु हे अहवाल वस्तुस्थितीला गृहीत धरूनच असावेत. कारण वस्तुस्थिती समोर आली नाही, तर शासनाला योग्य, आवश्‍यक उपाययोजना करताना, निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात. यामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन माहिती घ्यावी. शेतकऱ्यांशी संवाद साधूनच वस्तुस्थिती सातबारावर यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस दिले.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...