agriculture news in Marathi, Devendra Fadnvis says, A grade tourism grade will give to Kachargad, Maharashtra | Agrowon

कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देणार : देवेंद्र फडणवीस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थानच्या विकासासाठी त्याला ‘अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा, महाराष्ट्र शासन आवश्‍यक तो निधी देईल, असे त्यांनी सांगीतले. 

गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थानच्या विकासासाठी त्याला ‘अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा, महाराष्ट्र शासन आवश्‍यक तो निधी देईल, असे त्यांनी सांगीतले. 

राष्ट्रीय गोंडवाना महा अधिवेशनाच्या उद्‍घाटनप्रसंगी सोमवारी (ता. १८) मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. परिणय फुके, संजय पुराम यांच्यासह मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वेळी अटल आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. 

‘‘कचारगड यात्रेची परंपरा खुप मोठी आहे. या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात येतात. मी महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आहे, मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद व दर्शनाचा लाभ घेता आला. या ठिकाणी मिळालेली आशीर्वादरूपी ऊर्जा राज्याच्या विकासासाठी प्रेरणा देणारी आहे,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले. 

नागपूर शहर गोंड राज्याने वसविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की त्यांची नगररचना अप्रतिम होती. त्यांच्या काळातील किल्ले व विविध वास्तू पाहिल्यानंतर गोंडराजे किती पुरोगामी विचाराचे व दुरदृष्टी असलेले राजे होते याचा परिचय येतो. जल, जमीन व जंगल संवर्धनाचे काम आदिवासी समाजाने केले आहे.  
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कचारगड संस्थानच्या विकास आराखड्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. त्यासोबतच कचारगड परिसरात मोबाईल कनेक्‍टिव्हिटीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकाडे यांनी अनेक मागण्या आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या.
 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...