agriculture news in marathi, Devendra Fadnvis says, will help to empowerment of co-operative bank, Maharashtra | Agrowon

सहकार बळकटीकरणासाठी राज्य बँकेला शासनाचे पाठबळ : मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबई : राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. 

बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार  भारत भालके, सहकार आयुक्त सतीश सोनी, बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक आर. एल. बायस, विशेष कार्य अधिकारी अजित देशमुख  आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकाराच्या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण वारकरी पंथ हा सहकारावर आधारित आहे. विठ्ठल नामात एकरूप होऊन, एकमेकाला साह्य करून दिंडी चालली जाते. सहकाराचे क्षेत्रही असेच आहे. समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन समाजातल्या लोकांसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. बँकेने १०७ वर्षे पूर्ण करून १०८ व्या वर्षात पदार्पण करणे हे बाब बँकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या वाटचालीत बँकेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. आता बँक राज्यातील सहकार क्षेत्रात जिथे अडचणी आहेत तिथे पोचते आहे. सहकारी साखर कारखान्यांनाही त्यातूनच मदत केली जात आहे. कारखान्यांवर राज्यातील शेतकऱ्यांचे स्थैर्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना मदत करावीच लागेल. पण आता सूतगिरण्यांनाही मदत करावी लागेल.

‘‘राज्य बँक सहकाराचे क्षेत्र बळकट आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांनाही मदत करावी लागेल. जिल्हा सहकारी बँकांची अवस्था बिकट झाल्यास शेतकरी अडचणीत येतो. त्याला अन्य पर्याय राहत नाही. त्यामुळे या बँका मजबूत केल्या पाहिजेत. त्या जिवंत राहाव्यात, त्यांच्या विस्तारातून शेतकऱ्याला मदत करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. या बँकांच्या मदतीसाठी शिखर बँक म्हणून तयार केलेला आराखडा राबविण्यासाठी राज्य पाठबळ देईल,’’ असेही त्यांनी सांगितले.

शिखर बँकेने कालानुरूप उपविधीमध्ये बदल स्वीकारल्याचे आणि त्यातून अधिक पारदर्शकतेचा आग्रह धरल्याचे कौतुक करून राज्य सहकारी बँकेला सदृढ करण्यात प्रयत्न करणाऱ्या प्रशासक मंडळाबरोबरच, अधिकारी व कर्मचारी बँकेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी राज्य बँकेने ग्रामीण भागात पाेचून, सहकार आणखी समृद्ध करावा असे आवाहन केले.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...