agriculture news in marathi, devgad hapus will be available late in the market | Agrowon

देवगडचा हापूस महिनाभर उशिराने बाजारात येणार
राजकुमार चौगुले
बुधवार, 17 जानेवारी 2018

सिंधुदुर्ग : ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसत आहे. हंगामात सर्वांत आधी (अर्ली) बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. परिणामी सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा उत्पादकांना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्याच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे अपवाद वगळता हंगाम मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्ग : ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसत आहे. हंगामात सर्वांत आधी (अर्ली) बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. परिणामी सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा उत्पादकांना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्याच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे अपवाद वगळता हंगाम मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

पहिल्या टप्प्यातील मोहोरावर परिणाम
आंब्याला ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत तीन टप्प्यांत मोहोर येताे. पहिला मोहोर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, दुसरा डिसेंबर, जानेवारीमध्ये, तर तिसरा मोहोर फेब्रुवारीत येतो. ऑक्टोबरमध्ये जो मोहोर येतो तो आंबा साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतो. हा आंबा बाजारात येण्यासाठी देवगड भागातील बागायतदारांची ख्याती आहे. लवकर आंबा आल्याने याला हंगामापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर मिळतो. यंदा हवामान चांगले असल्याने नोव्हेंबरमध्ये मोहोर चांगला आला; पण अचानक वादळ झाल्याने थंडी कमी झाली, त्यातच कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे अस्तित्वच संपुष्टात आले. या मोहोराचे नुकसान झाल्याने फळे लागण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

डिसेंबरचे हवामान अनुकूल
वादळानंतर डिसेंबरमध्ये मात्र हळूहळू थंडी वाढत गेली, त्याचा सकारात्मक परिणाम आंबा बागांवर झाला. ती फळे आता वाढीच्या अवस्थेत आहेत; पण ही फळे येण्यास मार्चचा मध्यच उजाडणार असल्याने यंदा फेब्रुवारीत देवगड हापूसचा आस्वाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे देवगड तालुक्यातील चित्र आहे

२५ टक्क्यांनी फटका बसणार?
गेल्या वर्षी हापूसचे उत्पादन उच्चांकी (बंपर क्रॉप) होते. केवळ देवगड तालुक्यातच ५० ते ६० हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी अनुकूल हवामान असल्याने देवगड हापूसचे उत्पादन चांगले झाले. बहुतांशी झाडांना एक वर्षाआड मोहोर येत असल्याने यंदा काहीसे उत्पादन घटण्याची शक्यता बागायतदारांची आहे. यातच अर्ली आंब्याचे उत्पादन होणार नसल्याने तो उत्पादन घटीचा तोटा ही गृहीत धरता एकूणच यंदा आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ज्या वेळी वादळ झाले त्याच वेळी यंदा आमचा अर्ली हंगामातील आंबा बाजारपेठेत न जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे येत्या महिन्याच्या कालावधीत आंबा बाजारात येण्याची फारशी शक्यता नाही. दुसरा मोहोर चांगला आल्याने मार्चमध्येच पूर्ण वेगात हंगाम सुरू होण्याची दाट शक्यता आहे
- ॲड. अजित गोगटे, अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...