agriculture news in marathi, Dhanajay Munde critises Demonetization | Agrowon

नोटाबंदीमुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत : धनंजय मुंडे
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निर्णयांपैकी नोटाबंदीचा हा सर्वांत अयशस्वी निर्णय आहे. त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावे लागत आहेत. या निर्णयामुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत, असा आरोपही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक निर्णयांपैकी नोटाबंदीचा हा सर्वांत अयशस्वी निर्णय आहे. त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावे लागत आहेत. या निर्णयामुळे कृषी, असंघटित क्षेत्राची वाताहत, असा आरोपही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या (ता. 8) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुंडे यांनी सांगितले की, नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना जी उद्दिष्टे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली, त्यापैकी एकही उद्दिष्ट सफल झाले नाही. या निर्णयाचा एकही चांगला परिणाम दिसून आला नाही. उलट असंख्य दुष्परिणाम मात्र भारतीयांना भोगावे लागत आहेत. वर्षभरात नोटाबंदीमुळे बेरोजगारीचे संकट आले. असंघटित व कृषी क्षेत्राची अपरिमित हानी झाली. विकास दरातील घट आणि उद्योगांना याचा प्रचंड मोठा फटका बसला. त्याचे चटके यापुढील काळातही किती दिवस सोसावे लागतील हे सांगता येत नाही. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधारी पक्षाला अल्पकालीन राजकीय फायदा झाला असला तरी 125 कोटी जनतेला मात्र याचे चटकेच बसल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषी क्षेत्रावर आणि राज्य अर्थकारणावर झालेल्या चांगल्या-वाईट परिणामांची श्‍वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...