agriculture news in marathi, Dhananjay Munde criticizes state budget 2018-19 | Agrowon

अर्थसंकल्पातून गाजर ही मिळाले नाही : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018

मुंबई : जनतेला सातत्याने गाजर दाखवणा-या सरकारने अर्थसंकल्पातून गाजरही दिले नाही अशी टीका करीत काहीही नाविण्य नसणारा आणि जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबई : जनतेला सातत्याने गाजर दाखवणा-या सरकारने अर्थसंकल्पातून गाजरही दिले नाही अशी टीका करीत काहीही नाविण्य नसणारा आणि जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 राज्याच्या अर्थसंकल्पात साडे पंधरा हजार कोटींची तूट दाखवली असली तरी कर्जावरील व्याजापोटी द्यावी लागणारी रक्कम आणि सरकारची आर्थिक बेशिस्त लक्षात घेतली तर ही तूट 45 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचेल. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून साडेतीन वर्षांत भाजप-शिवसेनेच्या सरकारनं राज्याला दिवाळखोरीच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना श्री. मुंडे म्हणाले की, जुजबी तरतूद केलेल्या बहुतांश योजना पूर्ण होण्याची मूदत 2022 ते 2025 आहे. गेल्या साडेतीन वर्षातली सरकारची कामगिरी पाहीली तर त्या पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. आज उद्योग क्षेत्रात मंदी आहे. कृषीविकास दर घटला आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना समर्पित अर्थसंकल्प सरकारने सादर केला परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडला नाही, उलट आत्महत्या वाढल्या.
अर्थसंकल्पात घोषणा होऊनही त्यानुसार निधीची तरतूद होत नाही, तरतूद झालेल्या निधीत कपात केली जाते किंवा तो निधी खर्च होत नाही, याचा परिणाम विकासप्रक्रियेवर होत आहे. 

गेल्या साडेतीन वर्षात सरकारनं सातत्यानं जनतेची फसवणूक केली असून यंदाही अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. या अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना 'गाजर' दाखवण्याचं काम केलं आहे, अशी टीकाही श्री. मुंडे यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...