agriculture news in Marathi, Dhananjay Munde demands 4850 rupees msp for cotton, Maharashtra | Agrowon

कापसाला ४८५० रुपये हमीभाव द्या ः धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू केलेल्या कापूस खरेदीत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात कापसाला ४३२० रुपये अधिक ५०० रुपये बोनस असा गुजरातच्या धर्तीवर प्रतिक्विंटल ४८५० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई : राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू केलेल्या कापूस खरेदीत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात कापसाला ४३२० रुपये अधिक ५०० रुपये बोनस असा गुजरातच्या धर्तीवर प्रतिक्विंटल ४८५० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात नुकतीच १२१ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदीची घोषणा राज्य सरकारने केली असून, त्या पार्श्वभूमीवर श्री. मुंडे यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाइतका भाव मिळत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर हमीभावातील फरकाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासंबंधीचा कायदा करण्याची घोषणा करून सरकारने कारवाई केलेली नाही. यासंबंधी हिवाळी आधिवेशनात अशासकीय विधेयक आणून सरकारला कायदा करण्यास भाग पाडू, असा इशारा श्री. मुंडे यांनी दिला आहे.

राज्य सरकारकडून कापूस हमीभावाने खरेदीसाठी सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी कापूस पणन महासंघाद्वारे ६० केंद्रे व केंद्र शासनाच्या नोडल एजंट सीसीआयद्वारे ६१ अशा १२१ केंद्रांवर हमी दरावर कापूस खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. ‍मागील तीन दिवसांपासून महासंघाद्वारे ३९ कापूस खरेदी केंद्रांवर आणि उर्वरित २१ केंद्रांवर कालपासून कापूस खरेदीला सुरवात झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...