agriculture news in marathi, Dhananjay Munde drives tractor on Ballworm affected cotton field in pavnar, Wardha | Agrowon

धनंजय मुंडे यांना बोंडअळीग्रस्त पिकावर नांगर फिरवायला लावला...
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पवनार, जि वर्धा :  हल्लाबोल यात्रेनिमित्त येथे आलेल्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बोंडअळीने हतबल कापूस उत्पादक शेतकऱ्याने चक्क आपल्या पिकावर नांगर फिरवायला लावला अन् सर्वच सुन्न झाले...

पवनार, जि वर्धा :  हल्लाबोल यात्रेनिमित्त येथे आलेल्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बोंडअळीने हतबल कापूस उत्पादक शेतकऱ्याने चक्क आपल्या पिकावर नांगर फिरवायला लावला अन् सर्वच सुन्न झाले...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सध्या सरकार विरोधात हल्लाबोल यात्रा सुरु आहे.  या यात्रेनिमित्त आज (ता.७) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे आदी पवनार येथे आले होते. यावेळी येथील श्रीकांत तोटे या शेतक-याने स्वतःच्या बोंडअळीग्रस्त कापूस पिकाची अवस्था या सर्वांच्या नजरेस आणून दिली. तसेच श्री. मुंडे यांना या पिकावर नांगर फिरवायला लावला. 

याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ''विदर्भातील शेतकऱ्यांचा आता सरकारच्या पंचनाम्यावरही विश्वास राहिला नाही. बोंडअळीने झालेल्या नुकसानीने त्रस्त पवनार (जि वर्धा) येथील श्रीकांत तोटे या शेतक-याने स्वतःच्या कापूस पिकावर मला नांगर फिरवायला लावला, हा माझ्यासाठी एक दुःखद प्रसंग होता.''

मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. उभ्या कापसात नांगर चालण्याचे काम दुःखद अंतकरणाने करावे लागले. हे चित्र बघून  काळीज करपत आहे. आतातरी देवेंद्र फडणवीस सरकारने डोळे उघडावेत आणि कापसाला हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी. जो कापूस निघाला आहे त्याला ५०० रु. बोनस द्यावा, आशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली. 

फोटो गॅलरी

इतर बातम्या
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...
बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे सुरूपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचे...पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी...
विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच...नागपूर : ज्यूस उद्योग तसेच प्रक्रियेकामी उपयोगी...
नाशिकमध्ये ८३ आत्महत्याग्रस्त कुटुंबे...नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटनांना...
शेतीमालाची प्रतवारी, चाळणी सामग्री...पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री...
बोंड अळीला शासन, बियाणे कंपन्याच...जळगाव ः कपाशीचे बॅसीलस थुरीलेंझीस (बीटी) बियाणे...
शेतमाल खरेदीतील चुका शोधून एक महिन्यात...पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत...
कृषिपंपांची काहींना चुकीची वीजबिले :...नागपूर ः सरकारने कृषिपंपांचे आठ हजार कोटींचे दंड...
`क्रॉपसॅप`मधील चार वर्षांच्या 'पीएफ'...पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प...
किमान तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी...
गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा...अधिकृतरित्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे...