agriculture news in Marathi, Dhananjay munde says, declare drought at state immediately, Maharashtra | Agrowon

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई ः मराठवाड्यासोबतच संपूर्ण राज्यात या वर्षी अभूतपूर्व आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. 

मुंबई ः मराठवाड्यासोबतच संपूर्ण राज्यात या वर्षी अभूतपूर्व आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. 

मराठवाड्यात या वर्षी पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली असून, आलेली थोडीफार पिके ही करपून आणि विविध रोगांनी ग्रासली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे. राज्यातील या भीषण परिस्थितीबद्दल धनंजय मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. 

मागच्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री सातत्याने मुंबई, बिल्डरांचे प्रश्न, विविध ठिकाणांच्या मेट्रोंच्या प्रश्नावर बोलत आहेत. मात्र आमचा मराठवाडा आणि राज्यातील बळिराजा ज्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. त्यांच्याबद्दल आपण वारंवार मागणी करूनही एक चकार शब्दही का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला आहे. सरकारचे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण आहे का, असा सवाल उपस्थित करतानाच सरकारने केवळ सरकारी कागदे न रंगवता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा या राज्यातील शेतकरी जगणार नाही, अशी भीती ही मुंडे यांनी व्यक्त केली आहे.|

सरकारने केलेल्या कर्जमाफीची अद्याप नीट अंमलबजावणी नाही, मागील काळातील नैसर्गिक आपत्तींमधील जाहीर अनुदान अद्याप वाटप झालेले नाही. पीकविम्याचाही घोळ आहे आणि सरकार दुसरीकडे सक्तीची वीजबिल वसुली करीत आहे. खते बी-बियाण्यांच्या किमती वाढवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. 

वीजबील माफ करावे
सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, ज्या कृषी निविष्ठा (खते, बी-बियाणे) यांच्या किमती वाढवल्या आहेत, त्या किमती कमी कराव्यात, या वर्षीचे वीजबिल माफ करावे, सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क माफ करावे, हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, अशा मागण्याही मुंडे यांनी केल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
`डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ...शिर्डी, जि. नगर ः डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या...
खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठापुणे : पीक पतपुरवठा आराखड्याच्या शेतकऱ्यांना कर्ज...
हुडहुडी वाढलीपुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
दूध पावडर निर्यात योजनेचाही फज्जापुणे : राज्य सरकारवर विश्‍वास ठेवून कमी भावात दूध...
महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंदनवी दिल्ली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन...
पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार :...मुंबई : राज्यातील छोटी धरणे, तलाव यांमधील...
‘माफसू’ उभारणार पशुविज्ञान संग्रहालयनागपूर ः मुलांना प्राणीशास्त्र कळावे त्यासोबतच...
राज्यात शनिवारपासून महारेशीम अभियाननागपूर   ः रेशीमशेतीला प्रोत्साहन मिळावे, या...
बदलत्या वातावरणामुळे केळी निसवणीवर...जळगाव ः थंड, विषम वातावरणामुळे खानदेशात केळीच्या...
सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ आजपासून मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे...
दूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची...मुंबई: दुधाच्या पॉलिथीन पिशव्यांच्याबाबतीत राज्य...
सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून सात हजार...मुंबई : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत...
‘सेमीफायनल’मध्ये भाजपला झटकानवी दिल्ली ः लोकसभेची दिशा ठरविणाऱ्या आणि अतिशय...
नगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश...पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...