agriculture news in Marathi, Dhananjay Munde says Hallabol rally of Rashtravadi is now in Marathwada, Maharashtra | Agrowon

राष्ट्रवादी हल्लाबोल यात्रा आता मराठवाड्यात : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

परभणी : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांसह सामान्यांच्या प्रश्नांवर सरकारविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी तुळजापूर येथून या यात्रेस प्रारंभ होणार असून, ३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून या हल्लाबोल यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी रविवारी (ता.७) सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत दिली.

परभणी : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांसह सामान्यांच्या प्रश्नांवर सरकारविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी तुळजापूर येथून या यात्रेस प्रारंभ होणार असून, ३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून या हल्लाबोल यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी रविवारी (ता.७) सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘‘हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्क्के नफा या सूत्रानुसार भाव, बोंड अळीग्रस्तांना मदत आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह, त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न, बेरोजगारी, पाणीटंचाई आदी मराठवाड्यातील गंभीर प्रश्नांवर सरकारविरुद्ध आवाज उठवला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ३ सभा घेण्यात येतील. या यात्रेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कााँग्रेसचे सर्व नेते होणार आहेत,’’ असे श्री. मुंडे यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढत आहे. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे.या सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना हे सरकारच तसेच गृहविभागाचे अपयश आहे. मागच्या शंभर वर्षांत अशी घटना घडली नाही, ही घटना घडवून आणली आहे. या घटनेस सरकार जबाबदार आहे. तीन वर्षांत सरकार भ्रष्टाचारयुक्त झाले आहे. चार वर्षे दुष्काळात गेली आहेत. सरसकट कर्जमाफी दिली तरच शेतकरी उभा राहील,’’ असे श्री. मुंडे यांनी नमूद केले. 

हल्लाबोल यात्रेनिमित्त नांदेड जिल्ह्यात २१ जानेवारी रोजी उमरी, माहूर येथे, २२ जानेवारी रोजी दुपारी हिंगोली येथे, परभणी येथे २२ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता, २३ जानेवारी रोजी दुपारी पाथरी येथे त्यानंतर सेलू येथे सभा होणार आहेत. या वेळी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, आमदार डाॅ. मधुसुदन केंद्रे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...