माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडे

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

रावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहेत. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती लिहिलेली असते. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. माझा शेतकरी चोर आहे का, असा संतप्त सवाल राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त रावेर येथे जाहीर सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. आठवड्याभरापूर्वी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांंना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात सरकारतर्फे सुरू असलेल्या अवमानकारक पंचनाम्यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ज्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन पक्ष सत्तेत आला, त्याच पक्षाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरतात. त्याबाबत भाजपचा पदाधिकारी, नेता, मुख्यमंत्री यांनी साधी खंतही व्यक्त केली नाही. यापुढे जर महाराजांचा अपमान केलात, तर भाजपचा बीही राज्यात उरणार नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्राचा मोठा इव्हेंट मुंबईत पार पडला. त्या इव्हेंटच्या प्रत्येक वृत्तपत्राला मोठ्या जाहिराती सरकारने दिल्या; मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची एकही जाहिरात सरकारने दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारू इच्छितो, की ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन हे सरकार आले, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांनी जाहिराती का दिल्या नाहीत? या वेळी सौ. सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसे पाटील, गफार मलिक यांची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, माजी आमदार अरुण पाटील, सौ. चित्राताई वाघ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com