agriculture news in marathi, Dhananjay Munde's property seized | Agrowon

धनंजय मुंडेंच्या मालमत्तांवर टाच
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

अंबाजोगाई/परळी, जि. बीड : संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज थकविल्याप्रकरणी सूतगिरणीचे संचालक व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सात जणांची स्थावर मालमत्ता शासन संलग्न करण्याचा आदेश अंबाजोगाई येथील द्वितीय जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी दिला. संलग्न करायच्या मालमत्तांत धनंजय मुंडे यांच्या शेतजमिनीसह परळी येथील घराचाही समावेश आहे.

अंबाजोगाई/परळी, जि. बीड : संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज थकविल्याप्रकरणी सूतगिरणीचे संचालक व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सात जणांची स्थावर मालमत्ता शासन संलग्न करण्याचा आदेश अंबाजोगाई येथील द्वितीय जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी दिला. संलग्न करायच्या मालमत्तांत धनंजय मुंडे यांच्या शेतजमिनीसह परळी येथील घराचाही समावेश आहे.

जगमित्र नागा सूतगिरणीला बीड जिल्हा बॅंकेने तीन कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याची वेळेत परतफेड न झाल्याने थकबाकी 13 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेने मुंडे यांच्यासह सूतगिरणीच्या अन्य संचालकांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या अहवालात हा निधी दुसरीकडेच वळवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कलमे वाढविल्यानंतर आरोपींच्या मालमत्ता शासन संलग्न करण्याच्या कारवाईसाठी राज्य सरकारने पोलिस अधीक्षकांना प्राधिक्रुत केले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अंबाजोगाई न्यायालयात संबंधीचांच्या मालमत्ता संलग्न करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार द्वितीय जिल्हा न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी धनंजय मुंडे, जीवराज ढाकणे, भीमराव लिंबाजी मुंडे, मीरा रुद्रकंठवार, सुधाकर पौळ, महादू सानप, गोदावरी राजाराम मुंडे यांच्या मालमत्ता शासन संलग्न करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. या मालमत्तांवर बोजे चढविण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सूतगिरणीच्या सतरा संचालकांपैकी मी एक आहे. हा आदेश अंतिम नसून अंतरिम आहे. तो रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू. या प्रकरणात तपासाला कायम सहकार्य केले आहे.
-धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते 

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...