भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारा कोणीही नाही ः धनंजय मुंडे

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

सेलू, जि. परभणी ः केंद्र तसेच राज्य सरकारमधील कोणीही मंत्री शेतकरी नसल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारा कोणीही नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहेत, अशी टीका विधान परिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी केली. सेलू (जि. परभणी) येथे मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबेल ट्रस्ट व जिल्हा परिषद यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी व पशू, पक्षी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये शुक्रवारी (ता. २२) श्री. मुंडे बोलत होते.   या वेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, स्वागाताध्यक्ष आमदार विजय भांबळे, आमदार बाबाजाणी दुर्राणी, उपाध्यक्षा भावना नखाते, माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हा परिषदेचे सभापती अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, इंद्रायणी रोडगे, अजय चौधरी, संभाजी बिग्रेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, दादासाहेब टेंगसे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, हिंदूराव हुजरे, मुकेश बोराडे आदींची उपस्थिती होती. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे टाकरणार आहेत. श्री. मोदी शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. दुष्काळाची संकटे नेहमीच येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक संकटे आली. देवांवरही संकटे आली. त्यामुळे त्यांनी कधीच हार मानली नाही. प्रारब्धाशी दोन हात करण्याची हिंमत ठेवा. संकटांना घाबरू नका. या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याचे कौशल्य अवगत करावे,’’ असे आवाहनही श्री. मुंडे यांनी केले. या वेळी प्रगतिशील शेतकरी संजय नाईकवाडे, सदाशिव थोरात, सुधीर आघाव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार दुर्राणी, आमदार भांबळे, बोराडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शेरे यांनी केले. सूत्रसंचालन रामराव बोबडे यांनी केले. तर वसंत बोराडे यांनी आभार मानले. या वेळी परभणी, जालना जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com