पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे.
ताज्या घडामोडी
औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती) गटातील आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. या व इतर मागण्यांसाठी आमदार रामराव वडकुते यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या (ता.13) धनगर समाजाचा भव्य मोर्चा औरंगाबादेत काढण्यात येणार आहे.

राज्यात सध्या मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी आदी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासाठी शांती मोर्चे, ठोक मोर्चे एवढेच नाही तर आमदारांचे राजीनामा सत्र देखील झाले. परंतु अद्याप कुठल्याचा आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. आता नव्याने आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी यापुर्वी औरंगाबादच्या आमखास मैदानावर भव्य मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर आता उद्या धनगर समाजाला जाहीर करण्यात आलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते, सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी "पिवळं वादळ' औरंगाबादेत धडकणार आहे.
शहरातील कोकणवाडी चौकातून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकल धनगर समाजाचा भव्य धडक मोर्चा सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. धनगर समाजाला एस.टी. (अनुसूचित जमाती) चे आरक्षण देण्याचा जो निर्णय यापूर्वी झाला आहे त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, मेंढपाळांना स्वरसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावे, वन विभागाने भेंढ्यांसाठीचे चराई क्षेत्र मोकळे करावे तसेच धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलक व मेंढपाळांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुुक्तांना उद्या समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.
- 1 of 346
- ››