agriculture news in marathi, Dharma patil Funeral, Dhule, Maharahtra | Agrowon

साश्रू नयनांनी धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

गावात पाय ठेवायलाही जागा नव्हती; ठिकठिकाणी निषेधाचे फलक
धुळे : आपल्या कुटुंबाला वीजनिर्मिती प्रकल्पात शानाने अधीग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढा देणाऱ्या विखरण (देवाचे) (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील धर्मा मंगा पाटील (वय ८० वर्षे) यांच्यावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या विखरण या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावात पाय ठेवायलाही जागा नव्हती; ठिकठिकाणी निषेधाचे फलक
धुळे : आपल्या कुटुंबाला वीजनिर्मिती प्रकल्पात शानाने अधीग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढा देणाऱ्या विखरण (देवाचे) (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील धर्मा मंगा पाटील (वय ८० वर्षे) यांच्यावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या विखरण या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह धुळ्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. लढवय्या शेतकरी, असे उद्‌गार अनेक ग्रामस्थ धर्मा पाटील यांच्याबाबत काढत होते. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुंबई येथील एका रुग्णालयातून विखरणला दाखल झाले. त्यांचे कानाकोपऱ्यातील नातेवाईक रात्रीच पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी एकत्र आले होते.

सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गावातून अंत्ययात्रा निघाली. गावात पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढे शेतकरी, ग्रामस्थ अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी आले होते. धर्मा पाटील यांचा मोठा मुलगा नरेंद्र यांनी अग्नीडाग दिला.

सरकारी अनास्थेचा बळी, असा संदेश देणारे फलक गावात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी लावले होते. या फलकांवर मुंबई येथील मंत्रालयाची इमारत व त्यापुढे धर्मा पाटील यांचे चित्र होते. काही ग्रामस्थांनी शासनाच्या चालढलक व दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीवर जाहीरपणे टिका करून नाराजी व्यक्त केली.

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एक शोकसभा घेण्यात आली. त्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप सोनवणे, शरद पाटील, श्‍याम सनेर व इतर नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना महिनाभरात न्याय मिळेल. त्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन करून योग्य तो मोबदला शासन देण्याचा प्रयत्न करील, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...