देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला, ८७ रुपये लिटरचा दर !! 

देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला, ८७ रुपये लिटरचा दर !! 
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला, ८७ रुपये लिटरचा दर !! 

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील धर्माबाद व उमरी या तालुक्यात पेट्रोलचा दर मंगळवारी (ता. २२) ८७.०२ रुपये तर डिझेलचा दर ७३.६३ रुपये असा होता. हा दर सबंध देशात सर्वाधिक असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी (ता. २१) पेट्रोलच्या किमतीत ४५ ते ४७ पैशांनी तर डिझेलच्या किमतीत ३५ ते ३६ पैशांची वाढ करण्यात आली. आठवडाभरापासून सतत होणाऱ्या या दरवाढीने आज उच्चांक गाठला. या दरवाढीची कारणे अनेक असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचेही एक कारण आहे, अशी माहिती नांदेडमधील पेट्रोल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय मराठवाड्यातील तेलंगण सीमावर्ती भागातील धर्माबाद व उमरी या तालुक्यांचे अंतर मनमाड (जि. नाशिक) तेल डेपोपासून जास्त असल्याने त्याचा फटकाही या भागातील पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला बसत आहे.   नांदेड शहरात शुक्रवारी ८५.०७ रुपये प्रतिलिटर मिळणारे पेट्रोल मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून ८६.१७ रुपये तर डिझेल ७२.८३ रुपये मिळत आहे. त्याशिवाय मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि स्थानिक करांनुसार विविध जिल्ह्यांतील दरांमध्ये थोडाफार फरक असतो. शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव आपल्या तुलनेत स्वस्त अाहेत. दरवाढीमुळे डीलरची गुंतवणूक वाढत आहे. दरवाढीने डीलरचा फायदा होत असल्याचा ग्राहकांत गैरसमज निर्माण झाला अाहे. इंधन दरवाढीचा आणि कमिशनचा संबंध नसल्याने बॅंकिंग व्यवहारासाठी येणारा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. प्रतिदिनी होणाऱ्या दरवाढीचा तेल कंपन्यांना फायदा होत आहे. पर्याय नसल्याने डीलर, ग्राहक दरवाढीचा सामना करत असले तरी विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. - सतीश किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डिझेल असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com