agriculture news in marathi, Dharmabad has High petrol rate in country | Agrowon

देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला, ८७ रुपये लिटरचा दर !! 
सरकारनामा
बुधवार, 23 मे 2018

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील धर्माबाद व उमरी या तालुक्यात पेट्रोलचा दर मंगळवारी (ता. २२) ८७.०२ रुपये तर डिझेलचा दर ७३.६३ रुपये असा होता. हा दर सबंध देशात सर्वाधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील धर्माबाद व उमरी या तालुक्यात पेट्रोलचा दर मंगळवारी (ता. २२) ८७.०२ रुपये तर डिझेलचा दर ७३.६३ रुपये असा होता. हा दर सबंध देशात सर्वाधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

सोमवारी (ता. २१) पेट्रोलच्या किमतीत ४५ ते ४७ पैशांनी तर डिझेलच्या किमतीत ३५ ते ३६ पैशांची वाढ करण्यात आली. आठवडाभरापासून सतत होणाऱ्या या दरवाढीने आज उच्चांक गाठला. या दरवाढीची कारणे अनेक असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचेही एक कारण आहे, अशी माहिती नांदेडमधील पेट्रोल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय मराठवाड्यातील तेलंगण सीमावर्ती भागातील धर्माबाद व उमरी या तालुक्यांचे अंतर मनमाड (जि. नाशिक) तेल डेपोपासून जास्त असल्याने त्याचा फटकाही या भागातील पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला बसत आहे.  
नांदेड शहरात शुक्रवारी ८५.०७ रुपये प्रतिलिटर मिळणारे पेट्रोल मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून ८६.१७ रुपये तर डिझेल ७२.८३ रुपये मिळत आहे. त्याशिवाय मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि स्थानिक करांनुसार विविध जिल्ह्यांतील दरांमध्ये थोडाफार फरक असतो. शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव आपल्या तुलनेत स्वस्त अाहेत.

दरवाढीमुळे डीलरची गुंतवणूक वाढत आहे. दरवाढीने डीलरचा फायदा होत असल्याचा ग्राहकांत गैरसमज निर्माण झाला अाहे. इंधन दरवाढीचा आणि कमिशनचा संबंध नसल्याने बॅंकिंग व्यवहारासाठी येणारा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. प्रतिदिनी होणाऱ्या दरवाढीचा तेल कंपन्यांना फायदा होत आहे. पर्याय नसल्याने डीलर, ग्राहक दरवाढीचा सामना करत असले तरी विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.
- सतीश किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डिझेल असोसिएशन.

इतर बातम्या
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...