agriculture news in marathi, Dhule 138 farmers to get more compensation, Dharma Patil | Agrowon

धर्मा पाटलांमुळे १३८ शेतकऱ्यांना मिळणार न्याय
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई : मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या ८० वर्षीय प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या परिवाराला ५४ लाखांचा मोबदला दिला जाणार आहे, याशिवाय औष्णिक प्रकल्पाच्या बाधित अन्य शेतकऱ्यांना अतिरिक्त भरपाई मिळणार आहे. प्रकल्पामध्ये बाधित १९१ हेक्टर क्षेत्रातील १३८ शेतकऱ्यांना जवळपास ३८ कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. तर धर्मा पाटील यांच्या परिवाराला फेब्रुवारीअखेर मदत दिली जाणार असल्याचेदेखील मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या ८० वर्षीय प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या परिवाराला ५४ लाखांचा मोबदला दिला जाणार आहे, याशिवाय औष्णिक प्रकल्पाच्या बाधित अन्य शेतकऱ्यांना अतिरिक्त भरपाई मिळणार आहे. प्रकल्पामध्ये बाधित १९१ हेक्टर क्षेत्रातील १३८ शेतकऱ्यांना जवळपास ३८ कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. तर धर्मा पाटील यांच्या परिवाराला फेब्रुवारीअखेर मदत दिली जाणार असल्याचेदेखील मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला नुकताच सादर केला आहे. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना ५४ लाखांचा मोबदला मिळणार आहे. या फेरमूल्यांकनात पाटील यांच्या जमिनीला निम बागायती दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या शेतात आंब्याची काही रोपे होती. रोपांची वाढही पूर्ण झाली नव्हती, असा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. पण शेतातील विहीर आणि मागच्या काळातही काही बागायती उत्पन्न लक्षात घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला असल्याचे बावनकुळे म्हणाले. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील बागायती, निमबागायती आणि जिरायती या तीन प्रकारांत मूल्यांकन करून त्यांनाही मदत दिली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

धर्मा पाटील यांच्यासोबतच औष्णिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या ५२४ हेक्टर जमिनींपैकी १९१ हेक्टरवरील शेतकऱ्यांनीही तत्कालीन संपादनाला विरोध करून फेरमूल्यांकनाची मागणी केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींचेही फेरमूल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्यात येईल. त्या संदर्भातील निर्णय अधिवेशनाच्या आधी घेण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणात आघाडी सरकार असताना सुसूत्रता नव्हती. तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सरसकट शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला होता. तत्कालीन सरकारमध्ये या निर्णयाची नीट अंमलबजावणी न झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला होता. आता शेतकऱ्यांचे फेरमूल्यांकन करून व्याजासकट भरपाई देण्यात येईल. यासाठी प्राथमिक स्तरावर ३८ कोटी रुपयांचा निधी लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...