agriculture news in marathi, Dhule APMC starts enquitry in TDS cutting from farmers | Agrowon

अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार समितीकडून चौकशी सुरू
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर अडतदारांकडून ‘टीडीएस’च्या नावाने केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीसंबंधी बाजार समिती प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. कुठल्या अडतदारांनी टीडीएस कपात कोणत्या कायद्यानुसार केली याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ही वसली झाली त्या हेंदरुण (ता. धुळे) येथील शेतकऱ्यांनाही बाजार समितीने बोलावले आहे. 

धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर अडतदारांकडून ‘टीडीएस’च्या नावाने केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीसंबंधी बाजार समिती प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. कुठल्या अडतदारांनी टीडीएस कपात कोणत्या कायद्यानुसार केली याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ही वसली झाली त्या हेंदरुण (ता. धुळे) येथील शेतकऱ्यांनाही बाजार समितीने बोलावले आहे. 

धुळे बाजार समितीत टीडीएसच्या नावे शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसुली केली जात असल्याचे सविस्तर वृत्त ॲग्रोवनने शनिवारच्या अंकात (ता.१५) पान क्रमांक चारवर प्रसिद्ध केले. यामुळे अडतदारांमध्ये खळबळ उडाली आहे, तर बाजार समिती प्रशासन जागे झाले असून, ही वसुली कुणी केली आहे, याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. बाजार समितीत अनेक शेतकरी भाजीपाला, धान्य आणतात. हा टीडीएस भाजीबाजारातही वसूल केला का, याचाही उलगडा प्रशासनाने करायला सुरवात केली आहे. 

यासंदर्भात पणन संचालकांकडे तक्रार अर्ज करणारे हेंदरूण येथील शेतकरी मोहन भिसे यांना बाजार समितीमधील अडतदाराने मोबाईलवर संपर्क साधून आपण यापुढे ही वसुली करणार नसल्याचीदेखील ग्वाही दिली. पण यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती सचिव यांच्याकडेही लेखी तक्रार करण्याची भूमिका भिसे यांनी घेतली असून, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधल्याचे भिसे म्हणाले. 
बाजार समितीत अडत वसुली करणे कायदेशीर नाही; पण काही अडतदार टीडीएसच्या नावाने कशी वसुली करीत आहेत? याला कुठल्या कायद्याचा आधार आहे, अशा आशयाचे पत्र बाजार समिती प्रशासन अडत असोसिएशनला देणार आहे. तसेच भाजी व धान्य मार्केट यार्डातील अडतदारांसोबत बैठकही घेणार असल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आम्ही टीडीएसची कपात कुणी व किती केली याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. अडत असोसिएशनलाही पत्र दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ही वसुली झाली, त्यांनाही बोलावले आहे. त्यांच्याकडून नेमकेपणाने माहिती घेतली जाईल. 
- दिनकर पाटील, सचिव, धुळे बाजार समिती

इतर अॅग्रो विशेष
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....