agriculture news in marathi, Dhule district Bank lends 33.50 crore loan till date | Agrowon

धुळे जिल्हा बॅंकेतर्फे ३३.५० कोटींचे कर्ज वितरण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे पीककर्ज वाटप सुरू असून, आत्तापर्यंत ३३.५० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्जवाटपात बॅंक जिल्ह्यात आघाडीवर आहे, अशी माहिती बॅंकेतर्फे देण्यात आली. 

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे पीककर्ज वाटप सुरू असून, आत्तापर्यंत ३३.५० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्जवाटपात बॅंक जिल्ह्यात आघाडीवर आहे, अशी माहिती बॅंकेतर्फे देण्यात आली. 

जिल्हा बॅंकेच्या २३ एप्रिलला झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत "नाबार्ड''च्या धोरणाला अनुसरून रुपे किसान क्रेडिट कार्डअंतर्गत प्रत्यक्ष पीककर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. रुपे किसान क्रेडिट कार्डअंतर्गत "एटीएम''मधून दररोज २० हजार रुपये काढता येऊ शकतात. तसेच खते, बी-बियाणे खरेदीसाठी रोजची मर्यादा २५ हजार रुपये अशी एकूण ४५ हजार रुपये दिवसाला मर्यादा आहे. रुपे किसान कार्ड सर्व बॅंकांच्या "एटीएम''मध्ये कार्यान्वित होऊ शकते. कागदपत्रांची उपलब्धता करून दिल्यानंतर पीककर्ज मर्यादा मंजूर केली जात आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखांमार्फत २४ एप्रिल ते १० मे या पंधरवड्याअखेर ३३.५० कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. धुळे जिल्ह्यासाठी कर्जवाटप लक्ष्यांक १२५ कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी ७१.२० कोटी एवढा आहे. 

२०१७-१८ मध्ये उचल केलेल्या पीककर्जाची मार्च २०१८ व आजपर्यंत परतफेड केलेल्या सभासदांना नवीन वर्षासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्था, सभासदांनी जिल्हा बॅंकेच्या शाखेत आवश्‍यक "केवायसी'' कागदपत्रांची पूर्तता करून दिल्यानंतर रुपे किसान क्रेडिट कार्ड तत्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. 
 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...