धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती बिकट

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती बिकट
धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती बिकट

धुळे: जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट बनली आहे. यामुळे सिंचनासाठी पाणी पुरेसे नसल्याचे चित्र आहे. शिंदखेडा व साक्री तालुक्‍यातील लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत.  जिल्ह्यात फक्त पांझरा प्रकल्पाची स्थिती बरी असून, विविध भागातील पाझर तलाव, मध्यम प्रकल्पांमध्ये फारसा जलसाठा नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण १६ टक्के जलसाठा आहे. पावसाळ्यातच बुराई व इतर प्रकल्प भरले नव्हते. पांझरा प्रकल्पात परतीच्या पावसामुळे जलसाठा झाला. परंतु या प्रकल्पातून अनेक गावे व शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पांझरा नदीकाठावरील गावांमध्येही पाणीटंचाई आहे. तापी नदीचा लाभ शिंदखेडा व शिरपूर तालुक्‍यातील काठच्या गावांना मिळतो. सुलवाडे व सारंगखेडा बॅरेज तापी नदीवर आहे. परंतु त्यातून पाणी उचलून ते शेतापर्यंत पोचविण्याची योजना नाही.  तसेच विविध नद्या, नाल्यांवरील साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारेही कोरडेठाक पडले आहेत. यामुळे शेतशिवारात पाणी नाही. परिणामी पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होणार आहे. शिरपूर, शिंदखेडा भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यात शिंदखेडामधील धुळे व साक्रीनजीकच्या भागात पाण्याची समस्या आहे. ही समस्या भीषण होत असल्याने पांझरा व इतर नद्यांवरील प्रकल्पांमधून नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे. यामुळे नदीमध्ये पाणी पाझरून विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढेल व शेतशिवारात किमान कापूस लागवडीपुरते व पिण्यासाठीही पाणी मिळेल. टॅंकरची संख्या वाढतच आहे. आजघडीला १९ टॅंकर सुरू आहेत. तर टंचाईग्रस्त गावे जवळपास ४३ आहेत. येत्या पंधरवड्यात टंचाई आणखी बिकट होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com