धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यश

धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपचे अर्धशतक
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपचे अर्धशतक

धुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचून भाजपने १२ वर्षांनंतर सत्तांतर घडविले.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पालिकेच्या ७४ पैकी एका जागेवर समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड करण्यात आली होती. रविवारी (ता. ९) मतदान पार पडले. सोमवारी (ता. १०) मतमोजणी झाली. निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला १४, भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामला १, एमआयएमला ४, शिवसेनेला २ जागांवर समाधान मानावे लागले.

गोटे यांनी नेतृत्वाच्या विषयावरून बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांनी लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार उभे केले होते. पण त्यांच्या बंडाचा कोणताही परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसून आला नाही. भाजपने ६२ जागांवर उमेदवार उभे केले. त्यात ८० टक्के यश मिळाले. भाजपचे नेतृत्व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

शेंदुर्णी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

शेंदुर्णी (ता. जामनेर) नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली आहे. १७ पैकी १४ जागी भाजप विजयी झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन आणि कॉंग्रेसला एक जागा मिळाली आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात शेंदुर्णी आहे. अलीकडेच नगरपंचायतीची स्थापना झाली. यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. रविवारी (ता.९) मतदान झाले. दोन्ही कॉंग्रेस एकत्र येऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विजया अमृत खलसे या नगररपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरणार आहेत. दोन्ही कॉंग्रेसच्या उमेदवार क्षितीजा गरूड यांचा खलसे यांनी २२९२ मतांनी पराभव केला. जामनेरच्या राजकारणातील मातब्बर गरूड कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com