Agriculture News in Marathi, diasater on grape grower, sangli district | Agrowon

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

सांगली ः यंदाच्या हंगामात द्राक्षबागांवर सलग दुसऱ्या वेळी निसर्गाने अवकृपा केली आहे. लांबलेल्या पावसातून सावरण्यापूर्वीच बागायतदारांना अवकाळी पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

मंगळवारी (ता. ५) व बुधवारी (ता. ६) जिल्ह्यात काही भागांत पावसाची रिमझिम झाली. त्यात गुरुवारी (ता. ७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संकट काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

सांगली ः यंदाच्या हंगामात द्राक्षबागांवर सलग दुसऱ्या वेळी निसर्गाने अवकृपा केली आहे. लांबलेल्या पावसातून सावरण्यापूर्वीच बागायतदारांना अवकाळी पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

मंगळवारी (ता. ५) व बुधवारी (ता. ६) जिल्ह्यात काही भागांत पावसाची रिमझिम झाली. त्यात गुरुवारी (ता. ७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संकट काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या वर्षी निसर्गाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना साथ दिली. हंगाम चांगला गेला. द्राक्ष हंगामाच्या सुरवातीच्या काळापासून दर टिकून होते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, यंदा द्राक्ष हंगामाची परिस्थिती वेगळची निर्माण झाली. सुरवातीपासून पाण्याचे संकट होते. त्यानंतर पाऊस झाला. मात्र, द्राक्षाची फळ छाटणी झाली आणि फुलोरा अवस्थेत असताना पावसाने सुरवात केली. याच अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सर्वसाधारणपणे ५० टक्के फळकूज आणि डाउनी रोगाने बागा बाधित झाल्याने शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या. त्यात आगाप छाटणी केलेल्या द्राक्षबागेला मोठा फटका बसला. शेतकरी धास्तावले आहेत. बाजारात द्राक्षे लवकर आणण्यासाठी आगाप छाटणी केली जाते. या बागांमधील द्राक्षमण्यांत हळूहळू साखर भरायला सुरवात झाली आहे.

बाजारात द्राक्षे येण्याच्या दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणामध्ये पुन्हा बदल झाला. पावसामुळे द्राक्षे तडकण्याची भीती आहे. द्राक्षमणी गळून पडण्याचीही चिंता आहे. घडांमध्ये पाणी साचून राहिल्याने ते कुजण्याचा संभव आहे.

पूर्व भागात बेळंकी, सलगरे, लिंगनूर, कदमवाडी, चाबुकस्वारवाडी, संतोषवाडी, खंडेराजुरी, पायाप्पाचीवाडी या परिसरांत आगाप छाटणीच्या बागा जास्त आहेत. बागा वाचवण्यासाठी हजारो रुपये खर्चावे लागले. त्यातून सावरण्यापूर्वी आता पुन्हा अवकाळी पावसाला तोंड द्यावे लागत आहे.

 

पावसामुळे द्राक्षे तडकण्याची भीती आहे. वातावरणातील बदल पाहून तज्ज्ञांकडून सल्ले घेऊन फवारणी करा. द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे कमी दरामध्ये द्राक्षाची विक्री करू नये.
- मारुती चव्हाण, संचालक, द्राक्ष बागायतदार विभाग, सांगली, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...