agriculture news in marathi, Difference between IMD and AGRI Department Rain gauge recording | Agrowon

पावसाच्या वेगवेगळ्या नोंदीने शेतकरी चक्रावले !
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

पुणे : राज्यात एकाच ठिकाणी पडलेल्या पावसाच्या दोन वेगवेगळ्या नाेंदी हाेत असल्याने शेतकरी चक्रावले आहेत. धक्कादायक म्हणजे या नोंदींमधील पावसाच्या प्रमाणात प्रचंड मोठी तफावत अाहे. त्यामुळे पाऊस नेमका खरा मानायचा कोणाचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हवामान आधारित फळपीक विम्याकरिता कृषी विभागातील नोंदी ग्राह्य धरण्यात येत असल्याने नोंदीतील चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुणे : राज्यात एकाच ठिकाणी पडलेल्या पावसाच्या दोन वेगवेगळ्या नाेंदी हाेत असल्याने शेतकरी चक्रावले आहेत. धक्कादायक म्हणजे या नोंदींमधील पावसाच्या प्रमाणात प्रचंड मोठी तफावत अाहे. त्यामुळे पाऊस नेमका खरा मानायचा कोणाचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हवामान आधारित फळपीक विम्याकरिता कृषी विभागातील नोंदी ग्राह्य धरण्यात येत असल्याने नोंदीतील चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यात पडणाऱ्या पावसाची भारतीय हवामान विभाग आणि राज्य सरकारचा कृषी विभाग यांच्याकडे स्वतंत्र नोंद होत असते. कृषी विभागाकडून राज्यातील २०६५ कृषी मंडळामध्ये दररोज २४ तासांत होत असलेल्या पावसाची घेतली जाते. कृषी विभागाकडून १९९८ पासून ही सेवा सुरू करण्यात आली असून, २०१३ पासून मंडळनिहाय २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी दररोज अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. यापुढे जाऊन राज्य सरकारने मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या त्यांच्या मंडळातील पावसाची आकडेवारी मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी या पावसाची नोंद त्यांच्याकडे संकलीत करून ठेवतात. त्यानुसार त्यांचे पीक नियाेजन आणि भविष्यात नुकसान झाल्यास या माहितीची मदत होत असते. 

केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागातर्फे सरकारला पावसाच्या दीर्घकालीन अंदाज देण्याबरोबर अतिवृष्टी, गारपीट, तापमानातील वाढ, घट यांच्या नाेंदी घेतल्या जातात. बहुतांशी ठिकाणी महसूल विभागाच्या तहसील कार्यालयात असलेल्या पर्जन्यमापकात नोंदलेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागाकडे येते. त्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धोरणे ठरविण्यात येतात. या दोन्ही सरकारी यंत्रणांकडून एकच ठिकाणी नोंदविलेल्या पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत पाऊसमानाच्या आकडेवारीची तफावत अधिक वाढली आहे. 

कृषी विभागाच्या नाेंदी म्हणजे तोंडावर बोट
शुक्रवारी सकाळपासून कोकणात पावसाने जोर धरला आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी धुव्वाधार पाऊस झाला आहे. तशी नोंद हवामान विभागाकडे झाली. मात्र कृषी विभागाकडील नोंदी पाहून तोंडावर बोट ठेवावे अशी स्थिती आहे. राज्यातील इतरही ठिकाणांच्या पावसात मोठी तफावत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदला गेलेल्या पावसाची निवडक आकडेवारी पाहता, आम्ही केलेल्या तक्रारींचा पुरावा एक प्रकारे मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.   

साटेलोटे?
अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पावसात पडणारे खंड, गारपीट यांसारख्‍या आस्मानी संकटांमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी या पावसाच्या नोंदी उपयुक्त ठरतात. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ‘पीक विमा’ योजनेतून कवच दिले जाते. विमा कंपन्या लाभ देताना कृषी विभागाकडे नोंद झालेल्या पावसाच्या मंडलनिहाय आकडेवारीचा विचारात घेतात. त्यामुळे चुकीची आकडेवारी गोळा करून, पीकविमा कंपन्यांचे हित साधले जात असल्याचेच आणि साटेलोटे असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या.
 

कोकणातील पावसातील तफावत (मिलिमीटरमध्ये)

ठिकाण हवामान विभाग कृषी विभाग
मालवण ४९१ २६.३
वेंगुर्ला २६६ ३७.८
भिवंडी २१० ५५.२
मुरूड १३४ २७.८
पनवेल १३१.६ २७.३
रत्नागिरी १०२.४ ५४.०
गुहागर ११० ५२.५
सावंतवाडी १३१ ४४.२
कुडाळ १७५ ५०.५
देवगड १९० ३२.०
नेरूळ १२५.८ ०.३
खेड १०५ ५.५
श्रीवर्धन ९५.२ ६.८
म्हसळा ९५.२ ५५.०
ठाणे ८४ ५८.३

 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...