agriculture news in marathi, different structures for foodgrain storage | Agrowon

साठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम, पॉलिमर स्टोरेज बॅग
डॉ. आर. टी. पाटील
शुक्रवार, 4 मे 2018

शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक आवश्यक असते. लहान शेतकऱ्यांचा विचार करता प्री फॅब्रिकेटेड गोदाम, प्लॅस्टिक मेंब्रेन बॅग, पॉलिमर स्टोरेज बॅग उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर केल्यास काही काळासाठी धान्याची साठवणूक करणे सोपे जाणार आहे.

शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक आवश्यक असते. लहान शेतकऱ्यांचा विचार करता प्री फॅब्रिकेटेड गोदाम, प्लॅस्टिक मेंब्रेन बॅग, पॉलिमर स्टोरेज बॅग उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर केल्यास काही काळासाठी धान्याची साठवणूक करणे सोपे जाणार आहे.

प्री फॅब्रिकेटेड गोदाम ः
अन्नधान्य पुरवठा मदत करणाऱ्या संस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्गम भागात काम करणाऱ्या संस्थांसाठी धान्य साठवणूक किंवा इतर गोष्टींच्या सुरक्षिततेसाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. अशा वेळी प्री फॅब्रिकेटेड गोदामाची उभारणी उपयोगी ठरते. अलीकडे काही कंपन्यांनी जलद गतीने उभे करता येईल तसेच कमी खर्चामध्ये तयार होणारी प्री फॅब्रिकेटेड गोदामांची रचना तयार केली आहे. हे गोदाम उभारताना फ्रेम जमिनीवर योग्य पद्धतीने बसविणे आवश्यक असते. गोदाम उभारणीसाठी नळीची फ्रेम असते. या फ्रेमवर पीव्हीसीचा थर दिलेले पॉलिएस्टर कागदाचे आच्छादन योग्य पद्धतीने बसविले जाते. अशा प्रकारे ५० ते ३००० टन क्षमतेचे गोदाम बांधता येते.

प्लॅस्टिक मेंब्रेन बॅग ः
आॅस्र्टेलियातील शेतकरी धान्य साठवणुकीसाठी पॉलिमर मेंब्रेनचा वापर केलेल्या बॅगचा वापर करीत आहेत. या बॅग धान्य साठवणुकीसाठी चांगल्या आहेत. धान्याची पोती या बॅगमध्ये चांगल्या प्रकारे सुरक्षित रहातात. साधारणपणे ३ ते ४ महिने धान्याची चांगल्या प्रकारे साठवणूक होते.
 
पॉलिमर स्टोरेज बॅग ः
धान्य साठवणुकीसाठी पॉलिमर स्टोरेज बॅग उपयुक्त ठरतात. या बॅगमध्ये १०० टन धान्याची साठवणूक करता येते. सध्या मध्य प्रदेशात गहू साठवणुकीसाठी या बॅगचा वापर करण्यात येत आहे.

ramabhau@gmail.com
(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक अाहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...