जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल कार्यक्रम रखडला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध कामांना इंटरनेट कनेक्टिव्हीटी व संगणक परिचालक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. यामुळे ग्रामपंचायतींचा डिजिटल कार्यक्रम रखडला आहे. 

जिल्ह्यात सुमारे ११४९ ग्रामपंचायती आहेत. यातील अनेक ग्रामपंचायती पेपरलेस झाल्याचा दावा मध्यंतरी प्रशासन करीत होते. परंतु संगणक परिचालकांची कमतरता व पंचायतींमधील नेट कनेक्टिव्हीटीची अडचण यामुळे ऑनलाइन कामकाजाला अडचण येत आहे. सध्या ग्रामसेवकांना घरकुलांच्या कामांचे जिओ टॅगिंग व वित्त आयोगासंबंधीचे आराखडे अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर करायचे आहे. सीईओंनी या महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या कामासही अनेक ठिकाणी संगणक परिचालक उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत.

ग्रामपंचायती ११४९ आहेत, तर संगणक परिचालक पूर्ण ८५० देखील नाहीत. एका परिचालकांवर दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार काही ठिकाणी आहे. त्यात २६ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन करायचे निर्देश काही गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. नेट कनेक्टिव्हीटी नसल्याने संगणक परिचालकांना इंटरनेटची व्यवस्था करून घ्यावी लागते. आपल्या मोबाईल यंत्रणेचा वापर त्यासाठी करावा लागतो. अशा स्थितीत ग्रामपंचायतींचे कामकाज ऑनलाइन कसे होणार, असा प्रश्‍न काही सरपंचांनी उपस्थित केला आहे. 

ऑप्टिकल फायबर बंदच ग्रामपंचायतींसाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकून एक वर्ष झाले, परंतु ही यंत्रणा बंद आहे. इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळत नाही. यामुळे या केबलचाही उपयोग होत नसल्याची चर्चा ग्रामसेवकांमध्ये आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com