agriculture news in marathi, Dileep Valse patil demands sugar package for industry | Agrowon

उद्योगपतींना पॅकेज; मग शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे : देशातील साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र सरकारकडून उद्योगपतींसाठी पॅकेज आणि एनपीएतून वाचविण्यासाठी बॅंकांना सरकारी तिजोरी मोकळी केली जाते. दुसरीकडे अडचणीतील साखर कारखान्यांना डावलून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का केली जात आहे, असा रोखठोक सवाल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

पुणे : देशातील साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र सरकारकडून उद्योगपतींसाठी पॅकेज आणि एनपीएतून वाचविण्यासाठी बॅंकांना सरकारी तिजोरी मोकळी केली जाते. दुसरीकडे अडचणीतील साखर कारखान्यांना डावलून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का केली जात आहे, असा रोखठोक सवाल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

‘‘साखर कारखान्यांना एफआरपीपोटी शेतकऱ्यांना २५०० रुपये द्यावे लागत आहेत. त्यात पुन्हा इतर खर्च बघता अजून एक हजार रुपये टाकून कारखान्यांना एकूण ३५०० रुपयांनी साखर तयार करावी लागत आहेत. या साखरेला बाजारात मात्र २८०० रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे पुढील हंगामात काही कारखाने चालूच होणार नाहीत. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामीण अर्थकारणावर होईल,’’ असे श्री. वळसे यांनी बोलताना स्पष्ट केले.  

अडचणीत सापडलेल्या साखर कारखाना उद्योगाबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ तसेच इस्मानेदेखील केंद्र सरकारकडे समस्या कथन केली आहे. कारखान्यांसमोर उद्भविलेल्या अडचणींबाबत केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत. हा विषय गांभीर्याने घेतल्याचेही दिसत आहे. मात्र अजून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाच आम्ही साकडे घालून शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याची विनंती करणार आहोत. अर्थसंकल्पानंतर श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे कारखान्यांच्या अडचणी मांडल्या जाणार आहेत, असे श्री. वळसे म्हणाले. 

साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी निर्यात अनुदान देणे, आयात साखरेवर करवाढ लावणे, किमान २० लाख टनाचा बफर स्टॉक करणे असे तातडीचे धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवेत, असा आग्रह श्री. वळसे यांनी धरला आहे. 

साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे, तेथे तोट्याची भाषा नको  
साखर कारखान्यांबाबत सरकारची भूमिका नकारात्मक असते. तोटा होतो म्हणून कारखान्यांची वीज खरेदी केली जात नाही. साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे असून, कारखाने ग्रीन पॉवर तयार करतात. कारखान्यांचा लाभ देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे कारखान्यांशी व्यवहार करताना नफा-तोट्याची भाषा करू नये. कर्जबुडव्या उद्योगपतींसाठी ८० हजार कोटीची मदत करतात मग शेतकऱ्यांना मदतीसाठी हात का आखडतात, असा सवाल श्री. वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...