agriculture news in marathi, Dilip valse patil, Mumbai, Maharahtra | Agrowon

कृषी औद्योगिक क्षेत्रात वळसे पाटलांचे कार्य उल्लेखनीय
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई : राजकारणातील दुसऱ्या पिढीला नेतृत्व देताना थेट कॅबिनेट मंत्री करून जबाबदारी दिली. या पिढीने जबाबदारी समर्थपणे पेलून यशस्वी केली, यात दिलीप वळसे पाटील यांचे योगदान ठळकपणे दिसते. वळसे पाटलांचे कृषी आद्योगिक उभारणीसह ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील कामाने राज्याच्या विकासाला दिशा दिली, असे गौरवौद्‌गार माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

मुंबई : राजकारणातील दुसऱ्या पिढीला नेतृत्व देताना थेट कॅबिनेट मंत्री करून जबाबदारी दिली. या पिढीने जबाबदारी समर्थपणे पेलून यशस्वी केली, यात दिलीप वळसे पाटील यांचे योगदान ठळकपणे दिसते. वळसे पाटलांचे कृषी आद्योगिक उभारणीसह ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील कामाने राज्याच्या विकासाला दिशा दिली, असे गौरवौद्‌गार माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

रवींद्र नाट्य मंदिर येथे दिलीप वळसे पाटील एकसष्टी गौरव समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२७) पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्तू पाटील आणि मी ५० वर्षांपूर्वी एकत्रच विधानसभेत आलो. सत्तेतून विरोधात गेल्यानंतर भामरागड ते सांवतवाडी असा राज्यव्यापी प्रवास केला. दिलीपच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांनी मागास प्रदेशात विकासाची गंगा नेली. नव्या नेतृत्वाची फळीला मी थेट कॅबिनेट मंत्री केलं. राजकारणात संधी महत्त्वाची असते, महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्या पिढीने संधी सार्थ ठरविली त्यामध्ये वळसे पाटलांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राजकारणात सदहृदयी व्यक्ती, कुशल प्रशासक, प्रामाणिकपणा वळसे पाटलांच्या ठायी ठायी दिसतो. दूरगामी परिणाम लक्षात घेऊन ऊर्जामंत्री असताना त्यांनी भारनियमन उपाययोजना केली. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामाचे श्रेय वळसे पाटलांना जाते. विधानसभा अध्यक्षपदावरून सरकारला मार्गदर्शक नेतृत्व ठरल्याचे त्यांनी नमूद केले. अशोक चव्हाण, रामदास आठवले, दिवाकर रावते यांचीही या वेळी भाषणे झाले.
वळसे पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्काराला उत्तर देताना वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या आशीर्वादाने जीवन घडल्याचे सांगितले. राजकीय संधी १९८८ मधे मिळाली. ऊर्जामंत्री, अर्थमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. सर्वांचे प्रेम मिळाले. कोठेवाडी आणि माळीण दुर्घटना या कारकिर्दीतील मोठी आव्हानं असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिलीप वळसे पाटलांनी नेतृत्वामध्ये नेहमी विश्वास ठेवला. आयुष्यभरात तडजोड केली नाही. अनेकजण आयुष्यभर विरोधात काम केल्यावर सत्तेतही विरोधी पक्षासारखे काम करतात. वळसे पाटील मात्र यामध्ये योग्य समन्वय ठेवतात. अडचणीत  मदत केलेल्यांना मी नेहमी लक्षात ठेवतो. दिल्लीत सहकाराबद्दल निराशा असून धोरणाची गरज आहे. साखरधंदा अडचणीत असून त्याचे नेतृत्व दिल्लीत सक्षमपणे झाले पाहिजे. राज्यातील सिंचनही ४० टक्क्यांवर नेणार असल्याचे गडकरी म्हणाले.

१०० टक्के इथेनाॅल वापरून तयार मोटारसायकल टेस्ट झाली आहे. विदर्भात मदर डेअरीच्या मदतीने दूधधंदा वाढतोय. राजकारण समाजकारण आणि विकासाचा वारशाची महाराष्ट्राची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
 

इतर बातम्या
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
टेंभूच्या पाण्यातून दहा बंधारे भरून द्यासोलापूर : टेंभू-म्हैसाळ योजनेतून सांगोला...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
'सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा'सोलापूर : सिध्देश्वर यात्रा सुरळीतपणे पार...
उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट...देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यात मोठ्या...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना...परभणीः परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे...
येणेचवंडी प्रकल्पाला गळतीगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : येणेचवंडी (ता....
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...