agriculture news in Marathi, dinbandhu mahapatra says, banks should provide door service to costumer, Maharashtra | Agrowon

ग्राहकांच्या दारात सेवा देण्याची बॅंकांवर वेळ ः दिनबंधू महापात्रा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे : भविष्यातील बॅंकिंग पूर्णतः ग्राहक केंद्रित राहण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकांना ग्राहकांच्या दारात जाऊन सेवा देण्याची वेळ आली आहे. देशात सर्वप्रथम बॅंक ऑफ इंडियाने ही संकल्पना अमलात आणून काही श्रेणीतील ग्राहकांच्या दारात जाऊन विविध सेवा देणे सुरू केले आहे, अशी माहिती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक दिनबंधू महापात्रा यांनी दिली. 

पुणे : भविष्यातील बॅंकिंग पूर्णतः ग्राहक केंद्रित राहण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकांना ग्राहकांच्या दारात जाऊन सेवा देण्याची वेळ आली आहे. देशात सर्वप्रथम बॅंक ऑफ इंडियाने ही संकल्पना अमलात आणून काही श्रेणीतील ग्राहकांच्या दारात जाऊन विविध सेवा देणे सुरू केले आहे, अशी माहिती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक दिनबंधू महापात्रा यांनी दिली. 

पुण्यात बॅंक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रिटेल अॅग्री एक्स्पोचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. श्री. महापात्रा यांनी बॅंकेच्या काही निवडक खातेदारांशी या वेळी संवाद साधला. ‘‘ग्राहकांना त्यांच्या दारात सेवा देण्यासाठी ‘घर घर दस्तक’ ही संकल्पना चार महिन्यांपासून देशभर राबविली जात आहे. ग्राहकांची अपेक्षा जाणून घेत कामकाज करण्याची मध्यवर्ती संकल्पना यात आहे,’’ असे ते म्हणाले. 

बॅंक ऑफ इंडियाने ग्राहक आणि कर्मचारी यांच्या अनोख्या समन्वयाच्या बळावर देशभर शाखांचे जाळे उघडल्यानंतर विदेशातदेखील २४ केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे जगात प्रत्येक क्षणाला कुठेतरी या बॅंकेच्या शाखेत व्यवहारात होत असतो. बॅंकिंग उद्योगात सूर्यास्त न पाहणारी बॅंक असा लौकिक त्यामुळेच आम्ही मिळवला आहे, असेही श्री. महापात्रा यांनी नमूद केले. 

रिटेल अॅग्री एक्स्पोत मांडलेल्या कक्षाला भेट देऊन सुवर्ण तारण योजना व कृषिविषयक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. बॅंकेकडून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. किसान समाधान कार्ड तसेच स्टार भूमिहीन किसान कार्डदेखील वितरित केले जाते. कृषिपूरक उद्योगांच्या अर्थसाह्यासाठी बॅंकेने विविध उपक्रम हाती घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले. बॅंकेचे महाव्यवस्थापक अजयकुमार साहू, आर. एस. चौहान, टी. सुधाकर, स्वरूपदास गुप्ता, परशुराम पांडा, अरुण जैन, कृषी अर्थ विभागाचे महाप्रबंधक रवीकुमार, पुण्याचे विभागीय प्रबंधक के. एस. एम. शास्त्री, वसुली विभागाचे मुख्य व्यवस्थापक बी. व्ही. काकडे या वेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...