agriculture news in marathi, Direct Marketing of Oranges by farmers, | Agrowon

शेतकऱ्यांनी केले संत्र्याचे थेट मार्केटिंग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अमरावती ः थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा संत्रा थेट बंगळूर येथील मॉलला पाठविण्यात आला. त्या माध्यमातून ७ ते ८ हजार रुपये प्रतिटन अतिरिक्‍त पदरी पडले. 

अमरावती ः थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा संत्रा थेट बंगळूर येथील मॉलला पाठविण्यात आला. त्या माध्यमातून ७ ते ८ हजार रुपये प्रतिटन अतिरिक्‍त पदरी पडले. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या पुढाकाराने खरेदीदार विक्रेता संमेलन भरविण्यात आले होते. याला शेतकऱ्यांसह विविध खरेदीदारांचाही प्रतिसाद मिळाला. याच संमेलनात बंगळूर येथील बिग बाजार या मॉलकडून चांगल्या प्रतीच्या संत्र्याची मागणी करण्यात आली होती.

श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष रमेश जिचकार तसेच अध्यक्ष नीलेश मगर्दे यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर बिग बाजार व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यात सामंजस्य करार होत ३६९ क्रेट (८ टन) संत्रा पुरवठा आजवर करण्यात आला आहे. पंकज डंडाळे हे बिग बाजारचे कंपनी प्रतिनिधी म्हणून या भागात कार्यरत आहेत. 

फळांची हवी प्रत
६५ एमएमपेक्षा अधिक आकाराच्या संत्रा फळाची मागणी बिग बाजारने केली आहे. बंगळूरला क्रेट पाठविल्यास सात रुपये वाहतुकीवर खर्च येतो. सध्या स्थानिक स्तरावर २८ ते ३१ हजार रुपये प्रतिटनाचे दर आहेत. खर्च वजा जाता ३७ ते ३८ हजार रुपये टन असा दर शेतकऱ्यांना मिळाले.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...