थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी स्वतःचा शेतीमाल कुठेही थेट विक्री करू शकताे. असे असतानाही मात्र शहरांमध्ये थेट शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक गुंड, राजकीय हप्तेखाेर, महापालिकेचे वॉर्ड आॅफिसर, वाहतूक पाेलिस, अतिक्रमण विराेधी पथके, स्थानिक भाजी विक्रेते यांच्या त्रासाला आणि गुंडगिरीला सामाेरे जावे लागत असल्याचे विविध घटनांवरून समाेर आले. यामुळे नियमनमुक्तीचा कायदा करूनदेखील शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमाल स्वतः विक्री करता येत नसल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विक्रीसाठी संरक्षण देण्याची मागणी हाेऊ लागली आहे.

शेतीमाल विक्री व्यवस्थेतील बाजार समित्यांमधील खरेदी विक्री व्यवस्थेतील पारंपरिक जाेखड कायद्याने कायमचे काढण्यासाठी सरकारने फळे भाजीपाला नियमनमुक्ती केली. या निर्णयामुळे शेतकऱ्याला शेतीमाल बाजार समितीशिवाय शहरांमध्ये थेट विक्री करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली. या कायद्यामुळे शेतकरी स्वतःचा शेतीमाल बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरदेखील विक्री करू शकणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले हाेते. यानंतर या कायद्याचा अाधार घेत तरुण शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना शहरातील स्थानिक गुंड, हप्तेखाेर राजकीय कार्यकर्ते, महापालकेचे वॉर्ड आॅफिसर, वाहतूक पाेलिस, स्थानिक भाजी विक्रेते यांच्या त्रासाला आणि गुंडगिरीला सामाेरे जावे लागल्याचे प्रकार पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, कल्याण-डाेंबीवली, नवी मुंबई, दादर, घाटकाेपर आदी ठिकाणी घडले. या गुंडगिरीमुळे फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकऱ्यांनी थेट भाजीपाला विक्री करण्याचे प्रयत्न बंद केले अाहे.

याबाबतची घटना नुकतीच भाेसरी येथे घडल्याची माहिती ‘ॲग्राेवन’ला मिळाली. टाेमॅटाेचे दर मध्यंतरी प्रतिकिलाेला एक रुपयांपर्यंत घसरले हाेते. या वेळी टाेमॅटाे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली हाेती. याच दरम्यान शहरांमध्ये टाेमॅटाेची १० रुपये किलाेने विक्री हाेत हाेती. याच संधीचा फायदा घेत आेतुर, नारायणगाव परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी एक पिकअप गाडी भरून टाेमॅटाे विक्रीसाठी भाेसरीमध्ये आणले हाेते. या वेळी भाेसरीच्या भाजीमंडई बाहेर रस्त्याच्या कडेला टाेमॅटाेची विक्री सरू केल्यानंतर भाजीमंडईमधील विक्रेत्यांनी स्थानिक गुंडाना हाताशी धरून शेतकऱ्यांना हुसकावून लावले. तर गाडीची हवादेेखील साेडून देत, जवळ असलेल्या पंक्चर काढणाऱ्या व्यावसायिकाला हवा भरून न देण्यासाठी धमकीदेखील दिली हाेती. या वेळी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

अशीच घटना नियमनमुक्तीनंतर डाेंबिवली परिसरात थेट विक्रीसाठी भाजीपाला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांबराेबर झाली. वाहन लावून भाजीविक्री करत असताना, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून दाेन दिवसांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या शाखाप्रमुखाने भाजीपाल्याची मागणी केली. शेतकऱ्याने ही मागणी पूर्णदेखील केली. मात्र पुन्हा दाेन दिवसांनी माणसांच्या न्याय हक्कासाठीच लढणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या स्थानिक गुंडाने या जागेवर आमचा ताबा आहे, तुम्ही या ठिकाणी गाडी लावू शकत नाही. अशी धमकी दिली व गाडी लावायची असेल तर राेज १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. यामुळे आठ दिवस थेट भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने शेतीमाल आणणे बंद केले. 

तिसऱ्या घटनेत पुण्यात काेथरूड परिसरात थेट शेतीमाल विक्रीसाठीसाठी स्वतःचे खासगी वाहन वापरत असल्याचे कारण देत वाहतूक पाेलिसांनी वाहन जप्त करण्याची धमकी देत पैसे घेतल्याचीदेखील घटना समाेर आली आहे. या विविध घटनांमध्ये शेतकऱ्यांनी १०० किलाेमीटर दूर शहरात येऊन, शेतीमाल विक्रीचा प्रयत्न केला; मात्र पाेलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून याबाबतची तक्रार कुठेही न करता शेतीमाल विक्रीसाठी आणणे बंद केले.  

भाजीपाला विक्री करणारे मंत्री, नेते गेले कुठे? फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समित्यांनी या निर्णयाला विराेध करत बाजार समित्या बंद केल्या हाेत्या. या वेळी शेतकऱ्यांनी स्वतः शेतीमाल विक्रीसाठी आणत थेट विक्री केला हाेता. याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हाेता. या वेळी शेतकऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खाेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी विविध बाजार समित्यांमध्ये जाऊन शेतीमाल विक्री केला हाेता. मात्र यानंतर या सगळ्या नेत्यांचे थेट शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना संरक्षण देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे विविध घटनांवरून समाेर येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com