agriculture news in Marathi, directions for procured tur as division productivity, Maharashtra | Agrowon

महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार तूर खरेदीचे निर्देश
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करून देण्यात आलेल्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेच्या प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. 

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करून देण्यात आलेल्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेच्या प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. 

सुधारित सरासरी उत्पादकतेनुसार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिहेक्टरी १०.७६ क्विंटल, परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १९.४१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ६.०३ क्विंटल तूर खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किमतीने राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी ३१ जानेवारी रोजीच्या शासनाने परिपत्रक काढून जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकतेची मर्यादा ठरवून दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्यात शासकीय तूर खरेदीस सुरवात झाली; परंतु पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर विविध जिल्ह्यांत महसूल मंडळ निहाय उत्पादकता बदलत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे कृषी विभागाकडून जिल्ह्यांतील महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेचे प्रयोग गृहीत धरून प्राप्त झालेल्या सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ, तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हानिहाय सुधारित प्रतिहेक्टरी सरासरी तूर उत्पादकता आणि कंसात यापूर्वीची तूर उत्पादकता (क्विंटलमध्ये) ः औरंगाबाद ९.६२ (५.५०), जालना ११.३० (८.५०), बीड ७.१५ (६.५०), लातूर १६.०९ (१०), उस्मानाबाद १०.४५ (७), नांदेड १०.७६ (१२), परभणी  १९.४१ (७.५०), हिंगोली ६.०३ (७.५०), बुलडाणा ८.६८ (७.५०), अकोला ११.०८ (९), वाशीम ४.०२ (५), यवतमाळ १०.४३ (७), अमरावती १४.६३ (६), वर्धा ११.६९ (१२), नागपूर १४.०२ (१६.५०), भंडारा ३ (३), गोंदिया ६.५० (६.५०), चंद्रपूर २०.३८ (१०.५०), गडचिरोली ३.५० (३.५०), नाशिक १२.६८ (१०.५०), धुळे १२.४६ (१०.५०), नंदुरबार ८.०३ (६.५०), जळगाव ८.५१ (६), नगर ११.६१ (६.५०), पुणे ८.३९ (७), सोलापूर ८.३९ (५.५०), सातारा ५ (५), सांगली २.९१ (३.५०), कोल्हापूर ५ (८), ठाणे ६ (६), पालघर ५(५), रायगड ६.५० (६.५०), रत्नागिरी ४.५० (४.५०), सिंधुदुर्ग ४.५०( ४.५०).

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...