जिल्हा परिषदेच्या सभेवरून खडसे-महाजन गटांत मतभेद

जिल्हा परिषदेच्या सभेवरून खडसे-महाजन गटांत मतभेद
जिल्हा परिषदेच्या सभेवरून खडसे-महाजन गटांत मतभेद

जळगाव : जिल्हा परिषदेत चार पंचवार्षिकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपमध्ये दुही निर्माण झाली असून, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप केले आहेत. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला केला आहे. पाटील या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात. त्यांनी तेथून जिल्हा परिषदेचा कारभार करणे बंद करावे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेतील खडसे व महाजन समर्थक, असे दोन गट समोरासमोर आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आर्थिक विषयाच्या मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती सभा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यावर आली. सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महाजन यांनी सभा रद्द होण्याचे खापर थेट अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर फोडले आहे.

महाजन म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी गटनेते पोपट भोळे, सदस्य मधुकर काटे यांच्यासह गटनेत्यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी अध्यक्षांना फोन केला. त्यांनी सभा घेण्यासाठी २३ तारीख ठरविली. मात्र, नंतर अध्यक्षांनी ऐनवेळी सभा पुढे ढकलली. त्यांनी हा निर्णय का घेतला? याची आम्हाला माहिती नाही.``

पाटील जळगावपेक्षा मुंबईलाच अधिक राहत असल्यामुळे कोणतेही नियोजन होत नाही. मुंबईतून राहून त्या जळगाव जिल्हा परिषदेचा कारभार पाहत असतील तर नियोजन नक्की बिघडणारच आहे, अशी टिका महाजन यांनी केली. सभा रद्द करण्यात अधिकाऱ्यांचा दोष नाही. अध्यक्षांनीच सभा रद्द केली आहे. त्यामुळे नियोजन लांबणीवर पडत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com