agriculture news in Marathi, discharge of agitation girls without information to officials, Maharashtra | Agrowon

प्रशासनाला न कळविताच उपोषणकर्त्यांना डिस्चार्ज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नगर : पुणतांबे येथील उपोषणकर्त्या मुलींना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाला न कळविताच ‘डिस्चार्ज’ दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. प्रशासनाला न कळवताच अन्नत्याग अांदोलनातील कृषिकन्यांना जिल्हा रुग्णालयातून सोडल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी चांगलेच संतापले होते. 

नगर : पुणतांबे येथील उपोषणकर्त्या मुलींना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाला न कळविताच ‘डिस्चार्ज’ दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. प्रशासनाला न कळवताच अन्नत्याग अांदोलनातील कृषिकन्यांना जिल्हा रुग्णालयातून सोडल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी चांगलेच संतापले होते. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबे येथील कृषिकन्यांनी जिल्हा रुग्णालयातही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले होते. शनिवारी सकाळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर उपोषणकर्त्या कृषिकन्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिन्ही मुलांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रविवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून नेण्यात येणार होते. त्यामुळे मुलींवर उपचार सुरू झाल्यावर पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालयातून निघून गेले होते. मात्र उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिस संरक्षण होते. 

दरम्यान, आम्ही उपोषण सोडले असून आम्हाला सोडून द्या, असे म्हणून उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे डिर्चाज देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या मुलींना दुपारी डिर्चाज दिला. परंतु, डिर्चाज देताना जिल्हा प्रशासन अथवा पोलिस प्रशासनाला कल्पना दिली नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला कळविणे क्रमप्राप्त होते. 

मात्र त्यांनी काहीच कळविले नसल्याने सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्या वेळी निवासी जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयात नव्हते. तर उपस्थित डॉक्‍टरांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून दिल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी चांगले संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरपडपट्टी काढली. आरएमओ कोठे आहेत, असे विचारल्यावर संबंधित डॉक्‍टर निरुत्तर झाले. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संपत शिंदे यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी निघून गेले. सर्व तांत्रिक गोष्टी आहेत. पण नेमके कोणी कोणाला विश्‍वासात घेतले नाही याची चौकशी केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी ताटकळले
जिल्हाधिकारी कर्मचारी आणि आरएमओ सर्वच गायब होते. अपघात कक्षापासून थेट आरएमओच्या केबिनपर्यंत जिल्हाधिकारी गेले. मात्र त्यांना बसण्यास कोठेच जागा नव्हती. अखेर त्यांना सिटी स्कॅन कक्षामध्ये उपस्थित दोन डॉक्‍टरांशी चर्चा केली.
 

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...