agriculture news in Marathi, Discipline disbanded action on corruption in watershed development, Maharashtra | Agrowon

पाणलोट गैरव्यवहाराबाबत शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

पुणे : एकात्मिक पाणलोट विकासात केलेल्या गैरव्यवहाराबाबत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव कृषी विभागाचे आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांना सादर केला जाणार आहे. 

उस्मानाबादमध्ये कृषी खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील खडकी भागात झालेल्या कामांचीच चौकशी झाली आहे. खडकीमधून गोविंद देशपांडे यांनी या प्रकरणाचा राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे चौकशीला वेग मिळाला आहे. 

पुणे : एकात्मिक पाणलोट विकासात केलेल्या गैरव्यवहाराबाबत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव कृषी विभागाचे आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांना सादर केला जाणार आहे. 

उस्मानाबादमध्ये कृषी खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील खडकी भागात झालेल्या कामांचीच चौकशी झाली आहे. खडकीमधून गोविंद देशपांडे यांनी या प्रकरणाचा राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे चौकशीला वेग मिळाला आहे. 

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी १७ गावांमधील पाणलोट समित्यांच्या खात्यात जमा झालेल्या ५ कोटी ५६ लाख रुपयांचा हिशेब ठेवलेला नाही. ४ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च या कामांवर दाखविण्यात आलेला असून, ही रक्कम ठेकेदाराला साध्या चेकने दिलेली आहे. विशेष म्हणजे पाणलोट समितीला न विचाराताच खोटी कामे दाखवून निधी काढून घेण्यात आला आहे. 

राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने या गैरव्यवहाराबाबत काही सूचना वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेला केल्या होत्या. याबाबत शिस्तभंगाची कारवाई होईल, असे ''वसुंधरा''च्या अप्पर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 
२०१३ मध्ये झालेल्या पाणलोटाच्या कामांमध्ये पाच गावांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका कृषी आयुक्तालयाने ठेवला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावांमध्ये कंपार्टमेंट बांध बांधल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत. या कामांची अंदाजपत्रके तयार करताना चुकीचे दरदेखील वापरण्यात आलेत. 

तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव यांच्यावर या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडून ८५ हजार रुपयांची वसुली दाखविण्यात आली. मात्र, या प्रकरणात १२ अधिकारी कर्मचाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

गैरव्यवहारात गुंतलेल्या अधिकाऱ्याला बढती
उस्मानाबादच्या पाणलोट घोटाळ्यात तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तालयाला पाठविला होता. मात्र, निलंबनाऐवजी या अधिकाऱ्याला सहसंचालकपदी बढती मिळाली. शेतकऱ्यांच्या विकासाचे सोंग घेतलेली शासकीय यंत्रणा हा घोटाळा दाबून टाकत आहे. मात्र, याबाबत आपण उच्च न्यायालयातदेखील लढा देऊ, असे श्री. देशपांडे यांनी म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...