राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज महामंथन

केंद्र सरकार देशातील शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: याविषयी आग्रही आहेत. मी गेली ४० वर्षे ज्याकरिता धडपडत होतो, अखेर त्या विषयात काम करण्याची मोठी संधी या निमित्ताने मला मिळाली. माझ्याकडे कृषी विपणन, दळणवळण आणि कृषी मूल्यवर्धन व्यवस्था या गटाचे नेतृत्व आहे. प्रमुख सात गटांचे दोन दिवस मंथन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान स्वत: दुपारनंतर या सर्वगटांचे मत जाणून घेणार आहेत. आजपर्यंतचे हे शेती क्षेत्रासाठीचे सर्वांत मोठे मंथन असेल. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज महामंथन
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज महामंथन

नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी दोनदिवसीय राष्ट्रीय मंथनास उद्या (ता. १९) पासून येथे प्रारंभ होत आहे. केंद्र सरकारकडून आयोजित या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी (ता. २०) सहभागी होणार असून, देशभरातून कृषी क्षेत्रातील शेतकरी, अभ्यासक, व्यापारी, उद्योजक या क्षेत्राच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी चर्चा करणार आहेत.  पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान भवनात ‘कृषी २०२२-नवी सुरवात’ ही राष्ट्रीय परिषद होत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक सर्वोेत्तम धोरणाचा आराखडा निश्‍चित करण्याकरिता या परिषदेत सात गटांच्या माध्यमातून मंथन होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून सर्व्हे झाले आहेत, मात्र या कृषी आणि संगल्न क्षेत्रातील २५० तज्ज्ञ-अभ्यासक, शेतकरी, उद्योजक, व्यापारी, संघटना प्रतिनिधी यांच्याबरोबरच्या अभ्यासातून धोरणनिश्‍चितीसाठीची दिशा या परिषदेच्या माध्यमातून ठरविण्यात येणार आहे.  चर्चासत्रातील सात गट आणि विषय गट १ - कृषी धोरण, शेतकऱ्यांचे उच्च आणि शाश्‍वत उत्पन्नाकरिताच्या सुधारणा १.१ - अ) संपत्तीचा अपव्यय  - ब) धोरण, सुधारणा अाणि नियमन  १.२ - शेती निविष्ठा आणि सेवा : कृषी व्यवसायाची गरज  - निविष्ठा पुरवठ्याचे उदारीकरण (बियाणे, खते, कीटकनाशके)  १.३ - वनशेती आणि उदारीकरण (वाहतूक आणि व्यापार धोरण) - साग/बांबू अ) हरित क्षेत्राची शाश्‍वत वाढ ब) अतिरिक्त उत्पन्न आणि अधिक रोजगार संधींचे निर्माण क) मूल्यवर्धन 

गट २ - व्यापार धोरण आणि निर्यात प्राेत्साहन  अ) निर्यात प्रोत्साहन अाणि आयात निर्धारीकरण ब) शेतकऱ्यांचे हितरक्षण करणे क) व्यापार क्षेत्राचे स्थिरीकरण ड) निर्यात प्रोत्साहन

गट ३ - विपणन, दळणवळण, मूल्यवर्धन व्यवस्था  ३.१ - अ) बाजार संरचना आणि विपणन क्षमता  ब) किंमत अस्थिरता आणि बाजार स्थिरीकरण क) दर आणि मागणी अंदाज, इशारा उपविषय  

  • राज्यातील बाजार समित्या अाणि आधुनिकीकरण
  • थेट शेतातील काढणीपश्‍चात मूल्यवर्धन 
  • साठवणूक, वखारपालन आणि प्रक्रिया
  • मूलभूत सुविधा आणि मूल्यवर्धन साखळी उभारणीकरिता खासगी क्षेत्राला आकर्षित करणे
  • मार्केट इंटिलिजन्स आणि दर आणि मागणी अंदाज यंत्रणा 
  • राष्ट्रीय कृषी बाजार - ई-नाम
  • ३.२ - मूल्यवर्धन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन अ) कृषी दळणवळण आणि एकात्मिक शीतसाखळी ब) काढणीपश्‍चात नुकसान आणि व्यवस्थापन क) शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका, करार शेती आदी. ड) देशातील कृषी मूल्य व्यवस्थांकरिता राष्ट्रीय व्यासपीठाचे निर्माण

    गट ४ - अ) विज्ञान आणि तंत्रज्ञान 

  •  रोग अाणि कीड प्रतिकारक वाण
  •  हवामान बदल आणि मृदा आव्हान प्रतिकारक वाण
  •  अधिक उत्पादनाकरिता कृषी आणि पीक प्रणाली
  •  स्रोतांच्या क्षमता वृद्धीसाठी सेंसर तंत्रज्ञानाचा वापर
  •  भविष्यातील शेती, जनुकीय सुधारित, जनुक संपादन इ.
  •  सुरक्षित पिके
  • ब) कृषी क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’

  • कृषी क्षेत्रातील संचालन प्रक्रिया क्षमता वृद्धीसाठी माहिती अाणि तंत्रज्ञानाचा वापर 
  • शेती क्षेत्रात रोजगार अाणि सेवा सुविधांच्या विकासासाठी ‘स्टार्टअप्स्‌’ला प्रोत्साहन
  • गट ५ -  शाश्‍वत आणि समान विकास,  सर्वोत्तम सेवा पुरवठा अ) शाश्‍वत आणि समान विकास     ५.१ - पूर्वेकडील राज्य आणि डोंगराळ भाग विकासातील समस्या -  शाश्‍वत आणि समान विकास संधी उपविषय 

  • कृषी-हवामान विभागाधारित पीक नियोजन
  • अतिपर्जन्य भागात शाश्‍वत उत्पादन आणि उत्पन्नाकरिता व्यवस्था निर्माण 
  • हवामान बदल परिणाम आणि लहान व अल्पभूधारकांसाठी बदल व्यवस्थापन
  • पाणी आणि इतर निविष्ठांचा न्यायिक वापर
  • जमीन सुपीकता व्यवस्थापन आणि कार्डचा वापर
  • पंतप्रधान कृषी सिंचन योजना
  • परंपरागत कृषी विकास योजना
  • ब) सर्वोत्तम सेवा पुरवठा

  •  स्रोत आणि मनुष्यबळाचे एकात्मिकीकरण
  •  शेतकरीकेंद्रित माहिती आणि तंत्रज्ञानाची व्यवस्था
  •  देखरेख आणि नियंत्रणाकरिता संस्थात्मक व्यवस्थेचे निर्माण
  •  माहिती तंत्रज्ञान आधारित व्यवस्थापन माहिती व्यवस्था  
  • गट ६ - भांडवली गुंतवणूक आणि  शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा

  • सरकारी आणि खासगी स्रोतांचे एकात्मिकीकरण
  • खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी विशेष प्रोत्साहन
  • संस्थात्मक पतपुरठा लक्ष्य निर्धारीकरण - मध्यम व दीर्घ कालावधीचे कर्ज
  • गट ७ - पशुधन प्रोत्साहन, डेअरी,  पोल्ट्री आणि मत्स्यपालन विकास

  • पशुधन, डेअरी, पोल्ट्री आणि संलग्न उपक्रमांचे अधिक उत्पादन आणि उत्पादकता वाढीचे लक्ष्य
  • डेअरीतील पायाभूत सुविधांचा पुनर्विकास आणि संघटित क्षेत्राचा विकास 
  • अनुत्पादक जनावरांचा आर्थिक उपयुक्ता वाढ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com