agriculture news in Marathi, Discussion session on farmers suicide, Maharashtra | Agrowon

व्यथांना वाट मोकळी.. मागण्यांची निश्चिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

औरंगाबाद ः येथील महसूल प्रबोधिनीमध्ये ''मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न'' या विषयावरील चर्चासत्राला सोमवारी (ता. २६) प्रारंभ झाला. मंगळवारीही (ता. २७) या चर्चासत्राच्या निमित्ताने घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर निर्माण झालेले प्रश्न व त्यांची सोडवणूक करताना येणाऱ्या अडचणी, त्यांची सोडवणूक करताना होणारी दमछाक यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला शेतकऱ्यांनी वाट मोकळी करून देत आपल्या मागण्यांची निश्चिती केली.

औरंगाबाद ः येथील महसूल प्रबोधिनीमध्ये ''मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला शेतकऱ्यांचे प्रश्न'' या विषयावरील चर्चासत्राला सोमवारी (ता. २६) प्रारंभ झाला. मंगळवारीही (ता. २७) या चर्चासत्राच्या निमित्ताने घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर निर्माण झालेले प्रश्न व त्यांची सोडवणूक करताना येणाऱ्या अडचणी, त्यांची सोडवणूक करताना होणारी दमछाक यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला शेतकऱ्यांनी वाट मोकळी करून देत आपल्या मागण्यांची निश्चिती केली.

राज्य महिला आयोग आणि महिला किसान अधिकार मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्‍त वर्षा ठाकूर, एस. पी. सावरगावकर, तहसीलदार आम्रपाली कासोदेकर, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी चर्चासत्राची चार सत्रे पार पडली.

यामध्ये चर्चासत्र आयोजनाची पार्श्वभूमी, मराठवाड्यातील शेतीवरचे अरिष्ट, शासनाची भूमिका, आत्महत्याग्रस्त भागातील महिलांच्या प्रश्नींची मांडणी, आत्महत्याग्रस्त कुटुंब ठरविण्याचे निकष, वारसा, नोंदी, कर्जाची उपलब्धता, उपजीविकेसंबंधीचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ आदीवर चिंतन झाले.

पहिल्या दिवशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी, ‘‘प्रशासन आत्महत्याग्रस्त कुटुंबांपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळे येत्या चार एप्रिलला पुन्हा अधिकारी प्रत्यक्ष आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना विविध विकासाच्या योजनांमध्ये सहभागी करून घेतील’’, असे स्पष्ट केले. याचवेळी चर्चेवर आधारीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकरी महिलांच्या शासन प्रशासनदरबारी मागण्यांची निश्चिती करण्यात आली. 

मंगळवारच्या पहिल्याच सत्रात औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वारसा नोंदी, शेतीच्या योजनांचे लाभ याविषयी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्‍त वर्षा ठाकूर, उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती देशमुख आदींची उपस्थिती होती. आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देण्याची गरज व्यक्‍त करून परावलंबी न राहता सक्षमपणे स्वत: प्रत्येक अडचणी व प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन उपायुक्‍त वर्षा ठाकूर यांनी केले. संचालन मकामच्या सीमा कुलकर्णी यांनी केले, तर मनीषा तोकले यांच्यासह इतरांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग नोंदविला. 

या मागण्यांची झाली निश्चिती...

 • शासनाने तातडीची मदत म्हणून पाच लाख रुपये द्यावेत.
 • वारसा नोंदीचा प्रश्न कोणत्याही कारणाविना निकाली काढावा.
 • आत्महत्याग्रस्त कुटुंब सिद्ध करण्यातील क्लिष्ट अटी दूर कराव्यात.
 • घर नसलेल्यांना तत्काळ घर मिळावे. जागा नसलेल्यांना जागा मिळावी.
 • खासगी सावकारी कर्ज, मुकादमाची उचल माफ व्हावी.
 • स्वतंत्र कुटुंबाची प्रमुख म्हणून महिलेला ओळख मिळावी.
 • पाल्यांना उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण मिळावे
 • शेतीला लागणारी सर्व संसाधन मोफत मिळावी. 
 • उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळावे.
 • योजना व कागदपत्रांविषयी माहिती देणारे प्रशिक्षण दिले जावे.
 • मोफत आरोग्याची सेवा प्राधान्याने व तत्काळ मिळावी.
 • आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना पाच हजार पेन्शन मिळावी.
 • प्रत्येक तालुक्‍याला आत्महत्याग्रस्त महिलांचे प्रश्न सोडविणारी व्यवस्था हवी

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...