agriculture news in marathi, Disgruntled among agriculture officials in the state due to lack of transfers | Agrowon

बदल्यांअभावी राज्यात कृषी अधिकाऱ्यांमध्ये असंतोष
विनोद इंगोले
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढण्यासोबतच असंतोषही निर्माण झाला आहे.

एकाच ठिकाणी तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. कृषी विभाग मात्र याला अपवाद ठरला आहे. अनेक कर्मचारी पाच ते सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने त्यांच्या नजरा बदली आदेशाकडे लागल्या आहेत.

नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढण्यासोबतच असंतोषही निर्माण झाला आहे.

एकाच ठिकाणी तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. कृषी विभाग मात्र याला अपवाद ठरला आहे. अनेक कर्मचारी पाच ते सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने त्यांच्या नजरा बदली आदेशाकडे लागल्या आहेत.

तत्कालीन सरकारने राज्य कर्मचाऱ्यांकरिता एकाच ठिकाणी तीन वर्षे सेवा झाल्यानंतर अन्यत्र बदलीचे धोरण जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणीदेखील सर्वच खात्यांत होत आहे. परंतु राज्याचा कृषी विभाग मात्र याला अपवाद ठरल्याचे चित्र आहे. एकनाथ खडसे हे कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार केल्याचे वृत्त आहे. परंतु त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर कृषी विभागातील बदल्यादेखील खटाईत पडल्या. तब्बल दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याच करण्यात आल्या नाहीत.

त्यामुळे ज्यांना एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यांना पुढील दोन वर्षे बदल्या न झाल्याच्या धोरणाचा फटका बसला. एकाच ठिकाणी त्यांना इच्छा नसताना पाच ते सहा वर्षे सेवा द्यावी लागली. या विरोधात गेल्या वर्षी काहींनी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यासह इतर दुर्गम भागात सेवा देणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांसाठी हे धोरण अडचणीचे ठरले आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य आणि असंतोषही निर्माण झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...