agriculture news in marathi, dismiss Shahada APMC demands Swabhimani Shetkari Sanghatana | Agrowon

शहादा बाजार समिती बरखास्त करा : स्वाभिमानीची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

नंदुरबार : शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरात गहू व हरभऱ्याची खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे नुकतीच करण्यात आली. 

नंदुरबार : शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरात गहू व हरभऱ्याची खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे नुकतीच करण्यात आली. 

संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ६ एप्रिल २०१८ रोजी बाजार समितीमध्ये लिलावादरम्यान खरेदीदारांनी शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव किंवा किमान आधारभूत मूल्याच्या तुलनेत कमी दरात हरभरा व गव्हाची खरेदी केली होती. त्या वेळेस लिलाव प्रक्रिया थांबवून कमी दरात बाजार समितीत धान्याची खरेदी केली जात असल्याचे सभापती व सचिव यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु व्यापाऱ्यांबाबत नरमाईची भूमिका घेतली व संघटनेच्या कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर ज्या शेतकऱ्यांना हमीभाव हवा असेल त्यांनी बाजार समितीत आपले धान्य विकले नाही तरी चालेल. त्यांनी बाजाराबाहेर इतर कुठेही आपले धान्य विकावे, असा उर्मटपणा दाखविण्यात आला.

मग संघटनेने तहसील कार्यालयास या समस्येची माहिती देऊन या प्रश्‍नी आमरण उपोषण करू, असेही सांगितले. मग व्यापारी, शेतकरी व संघटना यांच्यासोबत एक बैठक घेऊन तोडगा काढायचा प्रयत्न केला. परंतु बाजार समितीमधील संचालक मंडळाने व्यापारी किंवा खरेदीदारांची बाजू घेतली. या प्रश्‍नी संघटनेने उपोषण केले. ते मोडून काढत कार्यकर्त्यांवर लाठीमार पोलिसांनी केला. हा सर्व प्रकार शेतकरी विरोधी आहे.

शेतकऱ्यांची बाजू कुणी मांडूच नये, यासाठी हा प्रकार झाला. हमीभावापेक्षा कमी दरात धान्य खरेदी करणाऱ्या आठ व्यापाऱ्यांचे परवाने प्रशासनाने रद्द केले होते. परंतु संबंधित व्यापारी पुन्हा लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ लागले आहेत. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्‍नही संघटनेने केला आहे. हा प्रकार सुरूच राहिला तर शेतकऱ्यांचे  कोट्यवधींचे नुकसान होईल. बाजार  समिती बरखास्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष घनश्‍याम चौधरी यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...