agriculture news in marathi, Dismissal of Administrative Circle of apmc, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : बाजार समित्यांच्या बदलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर पुणे बाजार समितीची निवडणूक लांबविण्यासाठी कार्यक्षेत्रात बदल करत पुन्हा हवेली कार्यक्षेत्र करण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, प्रशासकपदी बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांच्या आदेशाने बाजार समितीचे क्षेत्र आता पुणे शहर, हवेली, पिंपरी-चिंचवड तालुका करण्यात आले आहे. यामुळे आता नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार असल्याचे समजते. 

पुणे : बाजार समित्यांच्या बदलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर पुणे बाजार समितीची निवडणूक लांबविण्यासाठी कार्यक्षेत्रात बदल करत पुन्हा हवेली कार्यक्षेत्र करण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, प्रशासकपदी बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांच्या आदेशाने बाजार समितीचे क्षेत्र आता पुणे शहर, हवेली, पिंपरी-चिंचवड तालुका करण्यात आले आहे. यामुळे आता नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार असल्याचे समजते. 

सध्याच्या बाजार समितीचे क्षेत्र हे संपूर्ण जिल्ह्याचे होते. हे क्षेत्र कमी करून बाजार समितीचे केवळ पुणे शहर, हवेली आणि पिंपरी-चिंचवड तालुका एवढेच क्षेत्र निश्‍चित केले गेले आहे. क्षेत्र बदलण्यात आल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने अस्तित्वात येत असल्याने प्रशासकीय मंडळही बरखास्त करण्यात आले आहे. मावळत्या प्रशासकीय मंडळाची मुदत गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात संपली होती. या प्रशासकीय मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली गेली होती. ही मुदतवाढ या महिन्यात संपत होती. त्यामुळे प्रशासकीय मंडळ बरखास्त होणारच होते.

सत्ताधारी भाजपचे वर्चस्व या प्रशासकीय मंडळात होते, शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या एका सदस्याला या मंडळात स्थान दिले गेले. याच टप्प्यात आणखी तीन जणांना सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली गेली होती. गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत बाजार समितीच्या आवारातील फुलांच्या आंतरराष्ट्रीय बाजाराचे काम सुरू झाले. त्याचप्रमाणे बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ मालाच्या आवकेची नोंद सुरू झाली. त्याचप्रमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्प, भाजीपाला-फळ बाजाराचा पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार केला गेला होता. या प्रकल्पांना गती मिळू शकली नाही.

राज्यातील बहुतेक बाजार समितींच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचीही निवडणुक होणार का? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रशासकीय मंडळ नियुक्त केले तर त्यामध्ये प्रामुख्याने हवेली तालुक्‍यातील व्यक्तींना स्थान मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय मंडळातील उपसभापती भुषण तुपे, संताष खांदवे, मंगेश मोडक यांना नवीन प्रशासकीय मंडळात संधी दिली जाऊ शकते. तर प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी भुषण तुपे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...