agriculture news in marathi, Dissatisfaction in farmers about Government | Agrowon

सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत असंतोष : चव्हाण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असून, भाजपच्या घरवापसीचे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. ते पालघर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असून, भाजपच्या घरवापसीचे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. ते पालघर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

पालघर जिल्ह्यातील मनोर येथून काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबिरांना सुरवात झाली. या वेळी अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आत्महत्या वाढत आहेत. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाच्या नावाखाली जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. शेतकऱ्याची जात संपवण्याचा विडा भाजप सरकारने उचलला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा या सरकारवर विश्वास राहिला नसून, सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही.

देशाचे संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव असून, या विरोधात २६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत संविधान बचाव यात्रा काढणार आहे, असेही ते म्हणाले.

 

इतर बातम्या
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...