agriculture news in marathi, Distribute crop loans to farmers with priority | Agrowon

शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज वाटप करा ः रावते
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

जालना : शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी पैशांची आवश्‍यकता असून, अशा परिस्थितीमध्ये बॅंकांनी शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन संवेदनशीलपणे काम करत शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्जाचे वाटप करण्याचे निर्देश राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.

जालना : शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी पैशांची आवश्‍यकता असून, अशा परिस्थितीमध्ये बॅंकांनी शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन संवेदनशीलपणे काम करत शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्जाचे वाटप करण्याचे निर्देश राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. २८) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी श्री. रावते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक एन .व्ही. आघाव, अग्रणी बॅंक अधिकारी श्री. इलमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. रावते म्हणाले, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले.

कमी कर्जवाटपाबाबत नाराजी
जिल्ह्यातील बॅंकनिहाय पीक कर्जवाटपाचा आढावा घेतेवेळी बॅंकांनी कमी प्रमाणात पीककर्जाचे वाटप केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. बॅंकांनी कर्जवाटपाच्या कामात गती वाढवत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी उपस्थित बॅंक अधिकाऱ्यांना दिले. या वेळी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेचा सविस्तर आढावा घेतला. कर्जाच्या रकमेतून इतर बाबींसाठी रकमा बॅंकांनी वळती करून न घेण्याचे निर्देशही या वेळी श्री. रावते यांनी उपस्थित बॅंक अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅंक अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे. तालुकास्तरावर मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येत आहे. तहसील स्तरावर शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घेऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून, परिपूर्ण अर्ज बॅंकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठविणार आहेत. - रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी

इतर बातम्या
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
मेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...