agriculture news in marathi, Distribution of crop loans from nationalised banks | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

जळगाव : जिल्ह्यात खरिपासाठी पीक कर्जवाटपासंबंधी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल सुरू आहे. अद्याप फक्त पाच टक्केच पीक कर्ज या बॅंकांनी वितरित केल्याचे जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यातून समोर आले आहे. कर्जासाठी शेतकरी बॅंकांकडे वणवण फिरत आहेत. कर्जमाफीच्या लाभार्थींना तर कर्ज मिळेल की नाही, हादेखील प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जळगाव : जिल्ह्यात खरिपासाठी पीक कर्जवाटपासंबंधी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल सुरू आहे. अद्याप फक्त पाच टक्केच पीक कर्ज या बॅंकांनी वितरित केल्याचे जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यातून समोर आले आहे. कर्जासाठी शेतकरी बॅंकांकडे वणवण फिरत आहेत. कर्जमाफीच्या लाभार्थींना तर कर्ज मिळेल की नाही, हादेखील प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला. मशागती पूर्ण होत आल्या, परंतु अजूनही बॅंकांनी हवा तसा वित्तपुरवठा खरिपासंबंधी केलेला नाही. कर्जमाफीचे अडीच लाख लाभार्थी शेतकरी नव्या कर्जापासून वंचित आहेत. त्यांचे व्याज, कर्जाची रक्कम शासनाने त्यांच्या कर्ज खात्यात अजूनही भरलेली नसल्याने बॅंका ही रक्कम बॅंक कशी भरणार, असे सांगून त्यांना परतावून लावत आहेत. हा प्रकार कुणीही गांभीर्याने घेत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात सेंट्रल बॅंक ही अग्रणी बॅंक असून, सर्वाधिक खरीप वित्तपुरवठ्याची जबाबदारी याच बॅंकेची आहे. तर सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना मिळून सुमारे ६०० कोटी रुपये खरीप कर्जवितरण करायचे निश्‍चित आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १० जूनअखेर फक्त पाच टक्केच कर्ज वितरण केले आहे. नियमित कर्जदारांनाही कर्ज वितरण हव्या त्या गतीने सुरू नाही. बॅंक अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक ठिकाणी केल्या असून, नवे अधिकारी सर्व माहिती समजून घेण्यात व्यस्त आहेत. कर्ज वितरणाच्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.  

जिल्हा बॅंकेकडून ३६० कोटींपर्यंत वाटप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सर्वाधिक वित्तपुरवठा खरिपात करते. यंदाही अधिक वित्तपुरवठ्याची जबाबदारी या बॅंकेवर आहे. या बॅंकेने आतापर्यंत सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटी रुपये कर्जवाटप केल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडे कर्ज वितरणाची गती बॅंकेने वाढविली आहे. बॅंक सोसायट्यांना कर्ज देते. मग सोसायट्यांतर्फे शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. मध्यंतरी कर्ज मंजुरीसंबंधीचे तक्ते पूर्ण नव्हते. त्यामुळे कर्ज वितरण धीम्या गतीने सुरू होते. आजघडीला सर्व ८७७ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे कर्ज वितरणाचे तक्ते मंजूर आहेत. कर्ज वितरण या आठवड्यात आणखी गतीने होईल, अशी माहिती मिळाली.

बॅंका शेतकऱ्यांना कर्जवाटप करायला मागे पुढे पाहतात. त्यांना ताटकळत ठेवतात. कारण शेतकरी बॅंकेविरोधात बंड करू शकत नाहीत. बंड केले तर शेतकऱ्यांची सहज कोंडी करायचे प्रकार बॅंका करतात. या सर्व स्थितीत बॅंका पीक कर्ज वितरणासंबंधी गतीने काम करीत नसल्याची स्थिती आहे.
- भगवान पाटील, शेतकरी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...