agriculture news in marathi, Distribution of hundred Rupees per ton by 'Bhima' | Agrowon

‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगाम २०१७ -१८ मधील शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे निघणारी २००० रुपयांची पूर्ण रक्कम यापूर्वीच दिली आहे. उर्वरित २५० रुपयांपैकी १०० रुपयाचा हप्ता बुधवारपासून (ता. १४) वाटप करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी सांगितले.

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगाम २०१७ -१८ मधील शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे निघणारी २००० रुपयांची पूर्ण रक्कम यापूर्वीच दिली आहे. उर्वरित २५० रुपयांपैकी १०० रुपयाचा हप्ता बुधवारपासून (ता. १४) वाटप करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी सांगितले.

गतवर्षीच्या २०१७-२०१८ च्या गळीत हंगामात ४ लाख ११ हजार ८७६ मेट्रिक टन उसाचे गाळप कारखान्याने केले. १०.१० टक्के इतक्या साखर उताऱ्याप्रमाणे १९८० रुपये ‘भीमा’ची एफआरपी निघत असताना सभासदांच्या हितासाठी प्रतिटन २२५० रुपये जाहीर केले. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या सर्व उसाचे बिल सभासदांना अदा करण्यात आले आहे.

१६ ते २८ फेब्रुवारी व १ ते १८ मार्च या कालावधीत ऊसगाळप झालेल्या शेतकऱ्यांना २००० रुपये प्रमाणे या पूर्वीच पाहिली उचल दिली आहे. त्यांचे प्रतिटन २५० रुपयांप्रमाणे ऊसबिल रक्कम कारखान्याकडे थकीत होती, त्यापैकी १०० रुपये प्रमाणे २ कोटी ७० लाख रुपये बुधवारपासून कै. भीमराव महाडिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतून वाटप होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

उर्वरित १५० रुपये मकर सक्रांतीनंतर देण्यात येईल. चालू वर्षाच्या २०१८-१९ च्या गाळप हंगामासही आता सुरवात झाली आहे. कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप भीमा कारखाना करणार आहे. सभासदांनी भीमा कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...