agriculture news in marathi, The district administration and the Council should prepare the scarcity plan | Agrowon

सोलापूर जिल्हा प्रशासन, परिषदेने टंचाई आराखडा तयार करावा
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यात पाऊस पन्नास टक्केपेक्षा कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन टंचाई कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड, उपायुक्त प्रताप जाधव, दीपक नलवडे, अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यात पाऊस पन्नास टक्केपेक्षा कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन टंचाई कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड, उपायुक्त प्रताप जाधव, दीपक नलवडे, अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात संभाव्य टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी नव्या मानकानुसार सर्व माहिती गोळा करून ती आवश्‍यक त्या स्वरूपात तयार करायला हवी. त्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा. प्रस्ताव तयार करताना माहितीची सत्यता तपासून पाहा. टंचाईबाबतच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. त्यामध्ये दिलेल्या निकषांनुसार आराखडा तयार करताना काळजी घ्यावी.``

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बार्शी वगळता सर्व तालुक्‍यांत पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.``

अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगिले, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, शमा ढोक, शिवाजी जगताप, सचिन ढोले, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसीलदार मधुसूदन बर्गे, अमोल कदम, ऋषिकेश शेळके आदी या वेळी
उपस्थित होते.

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...