agriculture news in Marathi, District agri officer Jitendra Shinde has controversial history, Maharashtra | Agrowon

जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांचा इतिहासही वादग्रस्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे : मृद संधारणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशीत अडथळे आणून कृषी आयुक्तालयाला जेरीस आणणारे ‘पिस्तूल' फेम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांचे निलंबन झाल्याने कृषी आयुक्तालयाने अक्षरशः सुटकेचा निःश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा चार ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी कारवाईचा केलेला प्रयत्न श्री. शिंदे यांनी यापूर्वी हाणून पाडला होता. 

पुणे : मृद संधारणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशीत अडथळे आणून कृषी आयुक्तालयाला जेरीस आणणारे ‘पिस्तूल' फेम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांचे निलंबन झाल्याने कृषी आयुक्तालयाने अक्षरशः सुटकेचा निःश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा चार ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी कारवाईचा केलेला प्रयत्न श्री. शिंदे यांनी यापूर्वी हाणून पाडला होता. 

मृद संधारण कामात ९ लाख ४४ हजारांची अनियमितता असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने श्री. शिंदे यांना कृषी उपसचिव सु. सं. धपाटे यांनी अखेर २० डिसेंबरला निलंबित केले आहे. विधानसभेत कृषिराज्यमंत्र्यांनी केलेल्या शिंदे यांच्या निलंबनाच्या घोषणेमुळे उपसचिवांनी आदेश काढून कृषी आस्थापना विभागाला पाठविले आहे. 

‘‘श्री. शिंदे हे राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या अतिशय वजनदार आहेतच; पण खिशात पिस्तूल ठेवून कामावर येणारे ते एकमेव कृषी अधिकारी असल्यामुळे त्यांना साताऱ्यातील कर्मचारी सोडाच पण कृषी आयुक्तालयदेखील घाबरत होते. श्री. शिंदे यांच्याविरोधात गेलेल्या अधिकाऱ्याची बदली होते, 
असे वातावरण तयार झाल्यामुळे त्यांचे निलंबन करायचे कोणी? हाच प्रश्न होता,’’ असे आस्थापना विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात ई-निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची दाखविण्यात आल्याची तक्रार राज्याचे मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांपर्यंत गेली होती. या तक्रारीवर श्री. शिंदे यांच्याकडे खुलासा मागितला असता ते दाद देत नव्हते. तत्कालीन कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या मान्यतेने पाठविलेल्या पत्रांनाही श्री. शिंदे यांनी प्रतिसाद दिला नाही. 

‘‘आयुक्तांनी दक्षता पथकामार्फत साताऱ्यातील घोटाळ्याची चौकशी सुरू केल्यानंतरही श्री. शिंदे यांच्याकडून माहिती दिली जात नसल्यामुळे दक्षता पथकाचे प्रमुख रफिक नाईकवाडी यांनी आस्थापना विभागाकडे धाव घेतली होती. त्यामुळे आम्ही श्री. शिंदे यांना पत्र (कृआ-१०२१-२७-२१०६) पाठवून कोल्हापूर कृषी सहसंचालकांकडे खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते,’’ असे आस्थापना विभागाचे म्हणणे आहे. 

‘‘श्री. शिंदे हे कोणाच्याही पत्रांना भीक घालत नव्हते. त्यामुळे आस्थापना विभागाने त्यांना पुन्हा दुसरे पत्र पाठविले. ‘भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लेखी, तोंडी किंवा दूरध्वनीवरूनसुद्धा तुम्ही माहिती देत नसल्यामुळे तुमच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करू,’ असे दुसरे पत्रदेखील पाठविले. पण, त्यालाही श्री. शिंदे यांनी केराची टोपली दाखविली,’’ असे आस्थापना सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘‘राज्यातील एक पॉवरफुल कृषी अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. शिंदे यांची चौकशी करण्यासाठी अधिकारीही पुढे येत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ‘बंदुकीच्या गोळ्या खाण्यापेक्षा साईड पोस्ट द्या; पण शिंदे यांची चौकशी नको’, अशी भूमिका कर्मचारी घेत असल्याचे दिसते. त्यामुळे श्री. शिंदे यांच्या निलंबन काळात कोट्यवधीच्या कामांची चौकशी कोण, कशी आणि किती वेळात करणार हा प्रश्न राज्य शासनासमोर अजूनही कायम आहे,’’ असे आस्थापना विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.  

तीन ‘आयएएस’ अधिकाऱ्यांना न जुमानणारा अधिकारी 

  • राज्याचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांच्यापर्यंत श्री. शिंदे यांचे कारनामे गेले होते. ‘शिंदे यांना अकार्यकारी पदावरच कायमस्वरूपी नेमावे,’ असा शेरा डॉ. गोयल यांनी मारला. मात्र, शिंदे यांनी उलट मोक्याची जागा मिळवून डॉ. गोयल यांना शह दिला.   
  • तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांचा एक गैरव्यवहार उघड केला होता. त्यात त्यांचे जोडीदार कृषी अधीक्षक एस. एस. कोळी हे निलंबित झाले. तसेच, श्री. शिंदे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव (जाक्र-कोसंत-प्रक्र७१२) प्रधान सचिवांना पाठविला गेला. मात्र, श्री. दांगट यांना श्री. शिंदे पुरून उरले.
  • तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांनी श्री. शिंदे यांच्या चौकशीसाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या पत्रांना शिंदेंनी अजिबात किंमत दिली नाही. 
  • तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही एका पत्रात सातारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची १०० टक्के चौकशी करून दोषी अधिकाऱ्याला निलंबित करा, असे आदेश काढले. मात्र, श्री. शिंदे यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. 
  • विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत ठाम भूमिका घेतली. मात्र, आयुक्तालयाच्या पथकाला श्री. शिंदे कोणतीही माहिती देत नसल्याने चौकशी प्रक्रियाच बंद पाडली गेली आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...