पीककर्जासाठी जिल्हा बॅंक राज्य बॅंकेतील ठेवी काढणार

पीककर्जासाठी जिल्हा बॅंक   राज्य बॅंकेतील ठेवी काढणार
पीककर्जासाठी जिल्हा बॅंक राज्य बॅंकेतील ठेवी काढणार

सोलापूर  : खरिपासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात कर्ज मिळावे, यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रशासक आणि जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी बॅंकेच्या राज्य सहकारी बॅंकेकडे असलेल्या ठेवीपैकी शंभर कोटी रुपये काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांनी मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. पण, पावसाअभावी अजूनही अनेक भागांत पेरण्या खोळंबल्या आहेत. या हंगामातील कामासाठी बियाणे, खताची पुरेशी तरतूद करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. जिल्हा बॅंकांवर शेतकऱ्यांच्या पीककर्जाचा बोजा पडत आहे. तालुकास्तरावरून रोज शेतकऱ्यांची मागणी वाढतच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या ठेवी काढण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतल्याचे सांगण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com