agriculture news in marathi, District bank employee suspended | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंकेचा कर्मचारी निलंबित
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात ‘आगाऊ’पणाने कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावणारे मेसेज करणे, त्यातून बॅंकेची जनमानसातील प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी बॅंकेच्या मुख्यालयातील कनिष्ठ अधिकारी एम. व्ही. ताठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच गैरव्यवहार केल्याप्रकरणी मांडवे (ता. माळशिरस) येथील लिपिक आर. के. साळुंखे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. बॅंकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात ‘आगाऊ’पणाने कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावणारे मेसेज करणे, त्यातून बॅंकेची जनमानसातील प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी बॅंकेच्या मुख्यालयातील कनिष्ठ अधिकारी एम. व्ही. ताठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच गैरव्यवहार केल्याप्रकरणी मांडवे (ता. माळशिरस) येथील लिपिक आर. के. साळुंखे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. बॅंकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयात तब्बल २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ताठे यांना निलंबित करून बॅंकेने बेशिस्त कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. बॅंकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांना भडकावणारे मेसेज ताठे यांनी पाठवलेच, पण ताठे यांनी बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत, बॅंकेच्या इमारतीत जीवन विमा योजनेचा व्यवसायही केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मेसेज पाठविण्याची घटना ११ नोव्हेंबरला घडल्यानंतर १३ नोव्हेंबरला ताठे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्यांनी या खुलाशात कबूल केले. मात्र त्यांचा हा खुलासा अमान्य करत त्यांना निलंबित करण्यात आले. चौकशी अधिकारी म्हणून एम. सी. दुलंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मांडवे शाखेतील लिपिक साळुंखे करमाळा शाखेत कॅशिअर म्हणून कार्यरत असताना त्यांनी ४७ खातेदारांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले. पण ती रक्कम बॅंकेत जमा केली नाही. शाखाधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता साळुंखे यांनी याबाबत तोंडी कबुली दिली. साळुंखे यांनी चार हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले, की दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाईचा निर्णय बॅंकेच्या कार्यकारी समितीने घेतला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...