agriculture news in marathi, in district bank, but to give five crore to the Secretariat forcefully | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना पाच कोटी देण्याचा घाट
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास असमर्थता तसेच कर्मचारीही दोन महिन्यांपासून वेतनाविनाच असताना दुसरीकडे विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायट्यांच्या सचिवांना सरचार्जपोटी पाच कोटी रुपये देण्याचा घाट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घातला आहे. शुक्रवारी (ता. १५) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, तो मंजूर होणार काय, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास असमर्थता तसेच कर्मचारीही दोन महिन्यांपासून वेतनाविनाच असताना दुसरीकडे विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायट्यांच्या सचिवांना सरचार्जपोटी पाच कोटी रुपये देण्याचा घाट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घातला आहे. शुक्रवारी (ता. १५) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, तो मंजूर होणार काय, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण १,०६४ विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायट्या असून, त्यांच्यामार्फत कर्जवाटप आणि वसुली करण्यात येत आहे. या सोसायट्यांच्या सचिवांना वसुलीपोटी दोन टक्के सरचार्ज बँकेकडून दिला जातो. गेल्या वर्षी बँकेची वसुली जवळपास ३५० कोटी रुपयांच्या घरात असून, सरचार्जपोटी सचिवांना तब्बल पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. खरे तर सरचार्ज द्यावाच लागणार असला तरी बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. त्याचमुळे सभासदांना त्यांच्याच खात्यातील पुरेशी रक्कमही मिळत नसल्याचे चित्र आहे. जास्त रक्कम काढायची झाल्यास त्यामागे कारण द्यावे लागत आहे. म्हणजे बँकेच्या तिजोरीची स्थिती पाहूनच सावध पावले टाकण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर वेतन देण्यासही बँकेकडे पैसे नाहीत. दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविनाच आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपासून दिवाळीचा बोनसही मिळालेला नाही. दुसरीकडे मात्र सचिवांना सरचार्जपोटी पाच कोटी रुपये देण्याचा घाट घातला जात असल्याने यात नेमके कोणाचे आणि काय हित दडले आहे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

सचिवांना सरचार्ज देण्यासंदर्भात सहकार विभागाचे आदेश आहेत की नाही, याविषयीच साशंकता आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सहकार विभाग सरचार्जदेण्यासंदर्भात अनुकूल असण्याची शक्यता कमी आहे. तसेच बँकेची परिस्थिती पाहून अध्यक्ष केदा आहेर यांनी बँकेचे वाहन तसेच भत्त्यांचा त्याग केला आहे. अन्य संचालकांनीही त्यांचे अनुकरण केले आहे. दैनंदिन खर्चातदेखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सरचार्ज देण्याचे खूळ नेमके कोणाचे, हाही प्रश्‍नच आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...