agriculture news in marathi, The District Bank's Director in problem due to Job Recruitment | Agrowon

नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक अडचणीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली असतानाच आता विद्यमान संचालक मंडळावर नोकर भरतीसह विविध व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींनुसार सहकार विभागाने कलम ८३ अन्वये चौकशी केली. याच अनुषंगाने कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्‍चितीकरता जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी पूर्ण झाली असून २७ डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करणार असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी सांगितले.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली असतानाच आता विद्यमान संचालक मंडळावर नोकर भरतीसह विविध व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींनुसार सहकार विभागाने कलम ८३ अन्वये चौकशी केली. याच अनुषंगाने कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्‍चितीकरता जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी पूर्ण झाली असून २७ डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करणार असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी सांगितले.

अनुसूचित जाती व जमाती यांचे आरक्षण डावलून नियमबाह्य भरती करणार्‍या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची कलम ८८ अन्वये होणार्‍या दिरंगाईबाबत जनता दल सेक्युलरचे डॉ. गिरीश मोहिते यांनी बँकेच्या कार्यालयासमोर उपोषण केले.

सदर भरती प्रकरणी सहा महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आश्‍वासन २ जानेवारी रोजी दिले होते. मात्र तरीही कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत मोहिते यांनी आज पुन्हा बँकेच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले. या आंदोलनाची दखल घेत विभागीय सहनिबंधकांनी लेखी आश्‍वासन देत २७ डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.

जिल्हा बँकेत नियमबाह्य पद्धतीने ३०० क्लर्क व १०० शिपाई पदावर बेकायदेशीर भरती केल्याचा संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. ३० जूनपासून तीन महिन्यांत चार प्रकारच्या मुद्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३(१) नुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले होते.

त्यानुसार चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार नियम ७२ (३) अन्वये आरोपपत्र दाखल करण्याची कारवाई २७ डिसेंबरपर्यंत करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बँकेच्या संदर्भात नाबार्डचा निरीक्षण अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे बँकेच्या अनियमिततेबाबत संचालक मंडळावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल २९ एप्रिल रोजी सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयास पाठवण्यात आला असून त्यांनी याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कळवले असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे एकीकडे बँकेच्या अध्यक्षपदाचे वारे वाहू लागले असताना आता संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवारही आहे. विभागीय सहनिबंधकांच्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर मोहिते यांनी उपोषण मागे घेतले.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...